शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणकारी मंडळ स्थापन्यासाठी प्रयत्न

By admin | Updated: May 13, 2016 00:58 IST

राजेश क्षीरसागर : ‘जागतिक परिचारिका दिना’निमित्त कार्यक्रम; इंद्रधनुष्य स्मरणिकेचे प्रकाशन

कोल्हापूर : परिचारिकांच्या समस्या, त्यांचे प्रश्न, निवृत्तिवेतन, आदी मागण्यांसाठी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून कायमस्वरूपी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिले.महाराष्ट्र गव्हर्न्मेंट नर्सेस असोसिएशनतर्फे गुरुवारी ‘जागतिक परिचारिका दिना’निमित्त राजर्षी शाहू स्मारक भवन येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘सीपीआर’चे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद होते. प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून उपमहापौर शमा मुल्ला, असोसिएशनच्या अध्यक्षा हशमत हावेरी, नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या ए. ए. चौगुले, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस. पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे, डॉ. रूपेश शिंदे, आदी उपस्थित होते.आमदार क्षीरसागर म्हणाले, जिल्ह्यात खासगी रुग्णालये, ग्रामीण भागातील परिचारिकांना संघटित करून संघटना बांधावी. या सर्वांना एकत्र करून आपल्या मागण्या शासनापर्यंत पोहोचल्या तर त्यावर लवकर कार्यवाही करता येईल.यानंतर जुन्या-नव्या अशा विविध सुरेल गाण्यांचा ‘गीत गाता चल’ हा सदाबहार कार्यक्रम झाला. दरम्यान, असोसिएशनच्या ‘इंद्रधनुष्य’ या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आशा आडसुळे यांनी प्रतिज्ञापठण केले. फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांच्याबद्दल वर्षा पोवार यांनी माहिती सांगितली. जयराम चव्हाण यांनी जागतिक परिचारिका दिनाच्या घोषवाक्याबाबत माहिती दिली. एस. एस. पुजारी यांनी सूत्रसंचालन, संघटना सचिव श्रीमंती पाटील यांनी प्रास्ताविक, तर अविनाश कांबळे यांनी आभार मानले.'लोकमत'च्या जलमित्र अभियानाच्या पोस्टरचे अनावरणरुग्णसेवेसाठी आपले आयुष्य वाहून घेतलेल्या परिचारिकांना ‘जागतिक परिचारिका दिना’बद्दल ‘लोकमत’तर्फे शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी ‘लोकमत’च्या पाणी बचतीसाठी सुरू असलेल्या ‘जलमित्र अभियाना’च्या पोस्टरचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.