शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
2
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
3
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
4
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
5
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
6
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
7
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
8
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
9
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
10
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
11
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
12
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
13
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
14
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!
15
"शूट करुन मग सर्जरी करायची...", अपघातानंतर अलका कुबल यांना निर्मात्यांकडून आला कटू अनुभव
16
"आधार कार्ड अपडेट करून येते"; बहाणा सांगून लग्नाच्या १०व्या दिवशी पत्नी झाली फरार! सोबत नवऱ्याचे पैसेही नेले
17
ENG vs IND : भारतीय क्रिकेटमध्ये दुखवटा! मैदानात दोन्ही संघांतील खेळाडूंनी दिग्गज फिरकीपटूला वाहिली श्रद्धांजली
18
Gold Silver Price 24 June: एका झटक्यात सोनं झालं ₹२ हजारांपेक्षाही स्वस्त; Iran-Israel युद्ध थांबलं तर चांदीचीही चमक झाली कमी
19
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
20
पत्नीच्या हत्येचा आरोपी NSG कमांडो, 'ऑपरेशन सिंदूर'च्या नावाखाली बचाव करत होता, सुप्रीम कोर्ट काय म्हणाले?

मोतीनगरमध्ये व्याजासाठी सावकाराचा महिलेवर अत्याचार

By admin | Updated: May 12, 2016 00:49 IST

कुटुंबास मारहाण : प्रापंचिक साहित्याची तोडफोडही केली

कोल्हापूर : मोतीनगर येथे घरखर्चासाठी वीस टक्के व्याजाने घेतलेल्या दहा हजार रुपयांच्या व्याजापोटी खासगी सावकाराने महिलेवर अनेकवेळा लैगिंक अत्याचार केल्याचे उघडकीस आले. पीडित महिलेसह तिच्या कुटुंबास बुधवारी मारहाण करून प्रापंचिक साहित्याची तोडफोड केल्यानंतर सावकाराचे घृणास्पद कृत्य समोर आले. संशयित आरोपी धमेंद्र शिवलाल बागडे (रा. मोतीनगर) असे त्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, मोतीनगर येथे राहणाऱ्या पीडित महिलेने धमेंद्र बागडे याच्याकडून घरखर्चासाठी दहा हजार रुपये वीस टक्के व्याजाने घेतले होते. सहा महिने व्याज दिले. त्यानंतर आर्थिक अडचण आल्याने महिला व्याज देऊ शकली नाही. तिच्या गरिबीचा गैरफायदा घेत संशयित धमेंद्र बागडे याने व्याजापोटी तिच्यावर अनेकवेळा लै अत्याचार केला. बुधवारी दुपारी त्याने महिलेच्या पती व दिराकडे व्याजाची मागणी केली. त्यावरून त्यांच्यात जोरदार वादावादी झाली. सायंकाळी सहाच्या सुमारास हा वाद जातपंचायत कमिटीद्वारे मिटविण्याचा प्रयत्न करत असताना धमेंद्र बागडे, कल्पना बागडे, बसंती बागडे, संदीप बागडे, करिश्मा बागडे यांनी पीडित महिलेसह तिच्या पती, दीर व भावजयवर हल्ला चढविला. बिअरच्या बाटल्या डोक्यात फोडून चाकूने हल्ला केला तसेच घरावर दगडफेक करून प्रापंचिक साहित्याची तोडफोड केली. जखमी अवस्थेत महिला व नातेवाईक राजारामपुरी पोलिस ठाण्यात आले. पोलिस निरीक्षक अमृत देशमुख यांची भेट घेऊन झालेल्या घटनेची माहिती दिली. त्यांनी या सर्वांना सीपीआरमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी पाठविले. यावेळी पीडित महिलेच्या पतीने सीपीआर पोलिस व पत्रकारांना खासगी सावकार धमेंद्र बागडे याने व्याजाच्या बदली आपल्या पत्नीवर अत्याचार केल्याचे सांगितले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.खात्री करूनच गुन्हा पीडित महिलेने दिलेल्या माहितीची खातरजमा करून संशयित सावकारावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला जाईल. चौकशीमध्ये तसा काही प्रकार आढळून न आल्यास मारहाणीचा गुन्हा दाखल केला जाईल, असे राजारामपुरी पोलिसांनी सांगितले.