शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

चंदगडमध्ये जातीय सलोख्याचे वातावरण

By admin | Updated: July 10, 2015 21:54 IST

१०० वर्षांची परंपरा : जामा मस्जिदीमधून समाजाचे प्रश्न सोडविण्याबरोबरच न्यायनिवाडाही

नंदकुमार ढेरे - चंदगड -चंदगड या तालुक्याच्या ठिकाणी दोन मस्जिदी असून, तालुक्यातील सर्वांत जास्त संख्येने मुस्लिम बांधव चंदगड येथे राहतात. या समाजामध्ये रमजान महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व असून, नमाज पठण, रोजा, तरावीह पठण, दानधर्म, आदी धार्मिक उपक्रम या महिन्यात राबविले जातात.चंदगड येथे १०० वर्षांची परंपरा लाभलेली ऐतिहासिक शाही जामा मस्जिद व दुसरी शहामदार मस्जिद आहे. ऐतिहासिक परंपरा आणि वारसा लाभलेल्या जामा मस्जिदीमधून समाजाचे प्रश्न सोडविण्याबरोबरच न्यायनिवाडाही केला जातो. अमीरसाब हाजी अल्लाबक्ष मदार (तालुकाध्यक्ष), हिदायत लालसाब नाईक (सचिव), ईस्माईल हुसेन मुल्ला (शहराध्यक्ष) व इतर जाणत्या लोकांचा समावेश असलेल्या समितीमार्फत मस्जिदीचे काम चालते. येथे दररोज पाचवेळा नमाज पठण होते. रमजान महिन्यात तरावीह पठण असते. मस्जिदमध्ये सामुदायिक रोजा इफ्तार होतो.चंदगड येथील ऐतिहासिक परंपरा असलेल्या जामा मस्जिदीचा एकदा जीर्णोद्धार करण्यात आला आहे; पण सध्या जागा अपुरी पडत असल्याने लोकवर्गणीतून पुन्हा आकर्षक अशी मस्जिद उभी करण्यात येणार आहे. याचा आराखडाही तयार करण्यात आला आहे. चंदगडसह माणगाव, तांबूळवाडी, कोवाड, तळगुळी, राजगोळी, अडकूर, तुर्केवाडी, निट्टूर, कोरज, डुक्करवाडी, नागनवाडी, कुदनूर, हेरे, तिलारीनगर, आदी २० गावांत मुस्लिम समाज राहत असून, या ठिकाणी देखील छोट्या-मोठ्या मस्जिदी आहेत.नमाज पठण, तरावीह पठण, रोजा, इफ्तार, आदींसह विविध धार्मिक विधी होत आहेत. चंदगड पोलीस ठाण्यामार्फत इफ्तारचे दरवर्षी आयोजन केल जाते. यासाठी शासकीय अधिकाऱ्यांबरोबरच राजकीय नेते, कार्यकर्तेही हजेरी लावत असतात.चंदगडमध्ये हिंदू-मुस्लिम बांधवांमध्ये असलेला सलोखा तर वाखाणण्यासारखा आहे. एकमेकांच्या धार्मिक कार्यक्रमांत, वैयक्तिक सुख-दु:खात सहभागी होण्याची अनेक उदाहरणे फक्त चंदगडमध्ये पाहावयास मिळतात. दसरा, दिवाळी, गणेशोत्सवामध्ये जसे हिंदू धर्मीयांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरते, तसेच पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम समाजामध्ये धार्मिक वातावरणाची अनुभूती पाहावयास मिळत आहे. तालुक्यात मुस्लिम बांधव अल्लाहाच्या उपासनेत मग्न असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.‘जकात’ हा रमजान महिन्यात महत्त्वाचा घटक आहे. ‘जकात’ म्हणजे समाजातील गरीब व गरजू लोकांना मदत करणे. समाजातील ज्या लोकांकडे सात तोळे सोने व ५२ तोळ्यांपेक्षा अधिक चांदी असेल, अशा लोकांनी या संपत्तीच्या अडीच टक्के रक्कम दान करायची असते. तसेच माणसी पावणेदोन किलो गहू एकत्र करून गरीब व गरजू लोकांना वाटप केले जाते.