शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

कोविड मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी १२ टन लाकडाची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:23 IST

गडहिंग्लज : कौलगे (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामपंचायत व नाळ फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गडहिंग्लज पालिकेला १२ टन लाकूड व ...

गडहिंग्लज : कौलगे (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामपंचायत व नाळ फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गडहिंग्लज पालिकेला १२ टन लाकूड व पाच हजार शेण्यांची मदत दिली. कोविड मृतदेहावर गडहिंग्लज येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. अंत्यसंस्कारासाठी लाकूड, शेणी, आदी साहित्य मोठ्या प्रमाणात कमी पडत आहे. त्यासाठी लाकडे, शेणी, आदी साहित्य मदत करावे, असे आवाहन उपनगराध्यक्ष महेश कोरी यांनी केले होते. त्यास प्रतिसाद देत कौलगे ग्रामस्थांनी ही मदत दिली.

यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व फौंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, फौंडेशनने कोविडमुळे मृत्यू पावलेल्या सहा कुटुंबीयांच्या नातेवाइकांना ३५ हजारांची मदत व आठ हजार रुपयांचे कौटुंबिक साहित्य दिले आहे. मृत झालेल्या कुटुंबप्रमुखांच्या दोन्ही मुलांच्या दहावीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारीही फौंडेशनने उचलली आहे.

संस्थात्मक अलगीकरणात असणाऱ्यांना सिंगल कीट व स्वयंपाक करून खाणाऱ्यांना फॅमिली कीटसह, आदी साहित्य देण्यात आले आहे.

फोटो ओळी : कौलगे (ता. गडहिंग्लज) येथील गावकऱ्यांच्या मदतीतून जमा झालेली लाकडे व शेणी गडहिंग्लजकडे पाठविण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी व नाळ फौंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते.

क्रमांक : २३०५२०२१-गड-०८