शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा आॅगस्टमध्ये?

By admin | Updated: July 16, 2014 01:01 IST

राजकीय पक्षांना वेध : प्रशासनाची लगीनघाई सुरू

कोल्हापूर : राज्यातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील महिन्याच्या (आॅगस्ट) शेवटच्या आठवड्यात लागू होण्याची शक्यता गृहीत धरून कॉँग्रेस, राष्ट्रवादी या सत्तारुढांसह सर्वच राजकीय पक्षांनी त्याचबरोबर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तयारी सुरू केली आहे. दसरा संपल्यानंतर आणि दिवाळी सुरू होण्यापूर्वी म्हणजेच ५ ते १९ आॅक्टोबरच्या दरम्यान, विधानसभेची दोन टप्प्यात निवडणूक होऊ शकते. मतदारयादी अद्ययावत करण्याचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले असून, १ आॅगस्ट रोजी ही अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. राज्यात सर्वच राजकीय पक्षांनी आता विधानसभेची तयारी सुरू केली आहे. कार्यकर्त्यांना चार्जिंग करण्यासाठी मेळावे, बैठका, निर्धारयात्रा, मतदार जोडो अभियान यासारखे उपक्रम राबवून राजकीय नेते मतदारांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही राजकीय पक्ष आपल्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देत आहेत. रुसवे फुगवे काढत आहेत. उत्सुकांनीही आपल्या पद्धतीने उमेदवारीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू केली आहे. विविध उपक्रम व सार्वजनिक मोर्चे, मेळाव्यातून इच्छुक चमकण्याचा प्रयत्न करीत आहेत. आगामी निवडणुकीची तयारी प्रशासकीय पातळीवर मे महिन्यापासूनच सुरू करण्यात आली आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मतदारयादी पुनर्निरीक्षणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. ३० जूनपर्यंत मतदार नोंदणीसाठी अभिनव उपक्रमही राबविले गेले. त्यातून चांगला प्रतिसादही मिळाला. आता मतदारयादी अद्ययावत करण्याचे काम ३१ जुलैपर्यंत पूर्ण करून १ आॅगस्ट रोजी अंतिम मतदारयादी जिल्हा निवडणूक कार्यालयामार्फत जाहीर केली जाणार आहे, असे जिल्हा निवडणूक अधिकारी संगीता चौगुलै यांनी सांगितले.विधानसभेची निवडणूक गणपती उत्सव आणि दसरा झाल्यानंतर आणि दिवाळीपूर्वी होण्याची दाट शक्यता आहे. त्यादृष्टीनेच सगळी तयारी दिसत आहे. गणपती उत्सवात पोलीस यंत्रणेवर मोठा ताण असतो. दसऱ्यात तुलनेने कमी ताण असतो. त्यामुळेच ५ आॅक्टोबर ते २२ आॅक्टोबर या काळात निवडणूक घेण्याचे निश्चित केले जाऊ शकते, असा जाणकारांचा अंदाज आहे. जर आॅक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात विधानसभेची निवडणूक घेण्याचे निश्चित झाले, तर आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात आचारसंहिता लागू होऊ शकते. त्यामुळे कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्यांची धावपळ उडाली आहे. सरकारने केलेल्या कार्यक्रमाच्या जाहिराती प्रसिद्ध होऊ लागल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातही सरकारने निधी मंजूर केलेल्या कामांचा प्रारंभ करण्याचे नियोजन केले जात आहे. (प्रतिनिधी)