शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

वस्त्रनगरीस वेठीस धरणाऱ्या कामगारनेत्यांना जाब विचारा

By admin | Updated: August 10, 2015 01:18 IST

सागर चाळके : यंत्रमागधारक कृती समितीचा मेळावा; प्रश्न न्यायप्रविष्ठ असताना आंदोलन चुकीचे असल्याची टीका

इचलकरंजी : सायझिंग-वार्पिंग कामगारांचा संप करून वस्त्रनगरीस वेठीस धरल्याबद्दल कामगार नेते ए. बी. पाटील यांना आज, सोमवारी जाब विचारण्यासाठी सकाळी अकरा वाजता यंत्रमागधारकांनी शिवाजी पुतळा चौकात जमण्याचे आवाहन तांबे माळ यंत्रमागधारक कृती समितीचे अध्यक्ष सागर चाळके यांनी केले. रविवारी रात्री तांबे माळ येथील मराठा मंडळ सांस्कृतिक सभागृहात झालेल्या यंत्रमागधारकांच्या मेळाव्यामध्ये चाळके बोलत होते. सायझिंग-वार्पिंग कामगारांचा गेले वीस दिवस संप सुरू असून, संपामुळे आता यंत्रमाग कारखानेसुद्धा मोठ्या प्रमाणात बंद पडले आहेत. परिणामी वस्त्रनगरीची कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. याबाबत विचारविनिमय करण्यासाठी यंत्रमागधारकांचा मेळावा आयोजित केला होता. मेळाव्यामध्ये जिल्हा पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष दीपक राशिनकर, सायझिंग कृती समितीचे अध्यक्ष संतोष कोळी, इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी, पॉपलीन क्लॉथ पॉवरलूम संघटनेचे सचिन हुक्किरे, बंडोपंत लाड, तुकाराम पाटील, प्रकाश गौड, आदींची भाषणे झाली. सर्वच वक्त्यांनी कामगारांचा संप चुकीच्या वेळी आणि किमान वेतनाचा प्रश्न न्यायप्रविष्ठ असताना झाला असल्याबद्दल टीका केली.मेळाव्याच्या शेवटी चाळके यांनी सायझिंग उद्योगामध्ये वारंवार संप होत असल्याने त्याचा विपरीत परिणाम यंत्रमाग कारखान्यांच्या उत्पादनावर होत आहे. त्यामुळे यंत्रमागधारकांना नुकसान सोसावे लागत आहे, असे सांगून कामगार संघटनेवर टीका केली. तसेच यंत्रमागधारकांनी आज सकाळी अकरा वाजता शिवाजी पुतळा चौकात जमून तिथून सहायक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चाने येणाऱ्या कामगार नेते पाटील यांना जाब विचारण्यासाठी जाण्याचे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी) जाब विचारण्याबाबत यंत्रमागधारक संघटनांमध्ये मतभेदयंत्रमागधारकांचा मेळावा संपताच इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशन व कोल्हापूर जिल्हा पॉवरलूम असोसिएशन या दोन्ही संघटनांचा चाळके यांनी जाहीर केलेल्या कामगार नेत्यांना जाब विचारण्याच्या आंदोलनास पाठिंबा नसल्याचे सतीश कोष्टी व दीपक राशिनकर यांनी सांगितले. परिणामी आजचे आंदोलन जाहीर झाले असले, तरी त्याबाबत यंत्रमागधारक संघटनांमध्ये मतभेद असल्याचे दिसून आले.