शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ अश्राप जिवाला हवाय निवारा!

By admin | Updated: July 8, 2016 00:58 IST

पावसामुळे दैन्यावस्था : सहा-सात महिन्यांपासून फुटपाथवरच मुक्काम

मुरलीधर कुलकर्णी -- कोल्हापूर --जमिनीचं अंथरूण आणि आभाळाचं पांघरूण घेऊन तो गेल्या सहा-सात महिन्यांपासून फुटपाथवरच राहतोय. अंगावरच्या कपड्यांचीही त्याला शुद्ध नाही. कुणीतरी दिलेल्या शिळ्यापाक्या अन्नावरच त्याची गुजराण सुरू आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून मात्र त्याची अवस्था फारच दयनीय झाली आहे. दसरा चौकाजवळील वाहतूक नियंत्रण केंद्रापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या फुटपाथवर त्याचा मुक्काम आहे. तो येथे कधी आला, कसा आला, याबद्दल त्याला विचारले तर तो फारसे काही बोलत नाही; परंतु रस्त्यावरून येणा-जाणाऱ्यांना मात्र तो कधीच, कसलाही त्रास देत नाही. कोणी काही खायला दिले तर तो कसुनसे हसून नमस्कार करतो. पावसाळा सुरू झाल्यापासून मात्र त्याची अवस्था फारच दयनीय झाली आहे. मुसळधार पावसात दिवसभर तो फुटपाथवरच बसून असतो. रात्र झाली की तेथेच आडवा होतो. अंगावरचे कपडे, पांघरूण ओले चिंब झाले तरी त्याची त्याला शुद्ध नाही. त्याच्या हालचालीही आता पूर्वीपेक्षा मंदावल्या आहेत, असे आजूबाजूचे लोक सांगतात. अनेक दिवस अहोरात्र पावसात भिजल्याने त्याच्या अंगात तापही मुरला असावा, अशी शंका येते. त्याचे दिवस-रात्र भिजणे असेच पुढे चालू राहिल्यास त्याच्या जिवालाही धोका होऊ शकतो. या अश्राप जिवाला आज निवाऱ्याची गरज असून, त्याच्या पुनर्वसनासाठी समाजातील एखाद्या दानशुराने किंवा एखाद्या सेवाभावी संस्थेने पुढे येण्याची गरज आहे. नाव विचारले तर हेमंत साळोखे म्हणून सांगतो. घर कुठे आहे? असे विचारले तर रंकाळ्याजवळ म्हणतो.माझी एक संजना नावाची मावशी साने गुरुजी वसाहतीत राहते, असेही तो सांगतो; पण त्या मावशीचे आडनाव काय? तिचे घर नेमके कुठे आहे? असे विचारले तर त्याला काहीच सांगता येत नाही.घरी कधी जाणार? म्हणून विचारले तर ‘सच्या मला न्यायला येणार आहे. तो आला की मी दिवाळीला घरी जाणार’ असे भाबडेपणाने तो सांगतो. हा सच्या कोण आणि तो नेमका कधी येणार? हे मात्र त्याला सांगता येत नाही.