शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

कलाविषयक वाढीव गुण मार्च २0१७ पासूनच

By admin | Updated: March 18, 2017 18:56 IST

सुधारित आदेश : यंदा दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यानाही लाभ

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर : शास्त्रीय संगीत कला, लोककला आणि चित्रकलेमध्ये प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण मार्च २0१८ पासून होणाऱ्या दहावीच्या परीक्षेत देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने जानेवारी महिन्यात घेतला होता, परंतु हा लाभ मार्च २0१७ पासूनच म्हणजे आत्ता दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यानाही मिळणार आहे. यासंदर्भातील सुधारित शासन आदेश जारी करण्यात आला आहे. दहा वर्षे अस्तित्वात असलेल्या, धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी असलेल्या व तीन वर्षांचा लेखा अहवाल सादर केलेल्या संस्थांतून शास्त्रीय कलेची परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना कला क्षेत्रातील अतिरिक्त गुण देण्यासाठी ग्राह्य मानण्यात येणार आहे. ज्या संस्थांची नोंदणी सांस्कृतिक कार्य विभागाकडे असेल, त्या संस्थेचे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांने प्राप्त केलेले असल्यास, विद्यार्थी ज्या शाळेत इयत्ता दहावीमध्ये शिकत आहे, त्या शाळेच्या मुख्याध्यापकामार्फत ते तपासून प्रमाणित करण्यात येईल. सर्व प्रकारच्या वाढीव गुणांचा विद्यार्र्थ्याना प्रवेशासाठी फायदा होणार आहे. शास्त्रीय नृत्य, गायन आणि वादन यामध्ये या विद्यार्थ्याने कमीत कमी पाच वर्षाचे शिक्षण मान्यताप्राप्त संस्थेतून घेतलेले असावे, मान्यताप्राप्त संस्थांच्या तीन पीरक्षा उत्तीर्ण केलेल्या असल्यास, दहा गुण व पाच परीक्षा उत्तीर्ण केलेल्या असल्यास १५ गुण देण्यात येणार आहेत. या परीक्षा इयत्ता दहावीपर्यंत कधीही उत्तीर्ण केल्या तरी चालणार आहे. शास्त्रीय नृत्य, गायन व वादन प्रकारात राष्ट्रीय, राज्यस्तरीय पारितोषिक, शिष्यवृत्ती प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यास वाढीव २५ गुण दिले जाणार आहेत. परंतु अशा विद्यार्थ्यांस पहिला निर्णय लागू राहणार नाही.आठवी, नववी आणि दहावीमध्ये लोककला प्रकारातील किमान ५0 प्रयोग सादर केलेले असतील, अशा विद्यार्थ्यांस १0 गुण, तसेच २५ प्रयोगांसाठी ५ वाढीव गुण देण्यात येणार आहेत. आठवी, नववी आणि दहावीमध्ये राज्य शासनाच्या बालनाट्य स्पर्धेत प्रथम, द्वितिय व तृतीय क्रमांक पटकाणाऱ्या विद्यार्थ्यांस अनुक्रमे १५, दहा आणि पाच गुण वाढीव देण्यात येणार आहेत. पहिलीपासून शालेय स्तरावर कोणत्याही राष्ट्रीय स्पर्धेत अभिनयाचा पुरस्कार मिळविलेल्या विद्यार्थ्यास दहा गुण तर राज्यस्तरीय पुरस्कारासाठी पाच वाढीव गुण दिले जातील.चित्रकलेच्या इंटरमिजिएट परीक्षेत ए ग्रेड प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना १५ गुण, बी ग्रेड प्राप्त करणाऱ्यांना १0 गुण तर सी ग्रेड प्राप्त करणाऱ्यांना ५ गुण वाढीव दिले जातील. कला क्षेत्रासाठी असणाऱ्या २ टक्के आरक्षणामध्ये प्रवेशासाठी शास्त्रीय गायन, नृत्य, वादन या कला प्रकारात प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत चित्रकलेची इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचाही समावेश करण्यात येणार आहे.लोककला क्षेत्रातील अभ्यासक, संस्था व मंडळे यांच्याकडून लोककलासंदर्भातील अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमाच्या चार परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांस २0 वाढीव गुण आणि तीन परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांस १५ वाढीव गुण देण्यात येणार आहेत.