शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

नायट्रोजनचा पुरवठा विस्कळीत झाल्याने कृत्रिम रेतन अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:24 IST

कोल्हापूर : जिल्ह्यात नायट्रोजनचा पुरवठा विस्कळीत झाल्याने कृत्रिम रेतन अडचणीत आले असून सिमेन वेळेत मिळत नसल्याने पशुपालकांची घालमेल वाढली ...

कोल्हापूर : जिल्ह्यात नायट्रोजनचा पुरवठा विस्कळीत झाल्याने कृत्रिम रेतन अडचणीत आले असून सिमेन वेळेत मिळत नसल्याने पशुपालकांची घालमेल वाढली आहे. नायट्रोजन वाहतूक करणारे टॅंकर जिल्हा प्रशासनाने ऑक्सिजन वाहतुकीसाठी वापरल्याने पुरवठा विस्कळीत होऊन कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. रोज साधारणपणे २० ते २५ टन लागणारी ऑक्सिजनची मागणी एकदम ४५ टनावर पोहचली आहे. ऑक्सिजन आणण्यासाठी टॅंकर कमी पडत असल्याचे लक्षात आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने नायट्रोजन पुरवठा करणारे सर्वच टॅंकर ऑक्सिजन वाहतुकीकडे वळवले आहे. याचा परिणाम नायट्रोजनच्या पुरवठ्यावर झाला आहे.

दर महिन्याला साडेसात हजार लिटर नायट्रोजन जिल्ह्यासाठी लागते. अभिजीत एंटरप्रायजेसचे ही खासगी कंपनी जिल्ह्यासाठी नायट्रोजनचा पुरवठा करते. कृत्रिम रेतनासाठीचे सिमेन वापरा आधी लिक्वीड नायट्रोजनमध्ये बुडवून ठेवावे लागतात. डबल कोटेड क्रायोजनिक टॅंकरमधूनच पुणे, औरंगाबाद येथून नायट्रोजनचा पुरवठा केला जातो. जिल्ह्यात दुग्धोत्पादन जास्त असल्यामुळे महिन्याला तीन टॅंकर लागतात. पण सध्या टॅंकर नसल्याने दहा दिवसा ऐवजी १५ ते २० दिवसांनी एक टॅंकर येत आहे. त्यामुळे दर दहा दिवसाला नायट्रोजन पोहच होणारी यंत्रणाच विस्कळीत झाली असून रेतनाची प्रक्रियाच पुढे जात असल्याने पशुपालकांचे मोठे नुकसान होत आहे.

चौकट ०१

दरमहा १५ हजारावर कृत्रिम रेतन

जिल्ह्यातील १७५ शासकीय पशू वैद्यकीय दवाखान्यांना दरमहा पाच हजार तर गोकुळ , वारणासह खासगी रेतन सेवा केंद्राचे १० हजारावर असे एकूण १५ हजारावर सिमेन रेतनासाठी वापरले जातात.

चौकट ०२

काय परिणाम होणार

गाय, म्हैस माजावर आल्यावर वेळेत त्यांचे रेतन करावे लागते, अन्यथा भाकड काळ वाढून पुढील दूध उत्पादनाचा मोठा फटका बसू शकतो.

चौकट ०३

अशी आहे किंमत

कृत्रिम रेतनासाठी एका सिमेनची किंमत शासकीय दवाखान्यात ४१ रुपये तर खासगीमध्ये १५० रुपये इतकी आहे.

प्रतिक्रिया

टॅंकर अभावी विस्कळीत झालेल्या नायट्रोजनच्या पुरवठ्यामुळे कृत्रिम रेतनावर परिणाम होत असल्याने जास्त मागणी असणाऱ्या पशुवैद्यकीय केंद्रावरच नायट्रोजन पुरवठा करण्यास प्राधान्य दिले आहे. करारानुसार पुरवठा होणारच आहे, पण तो थोडा पुढे मागे होत आहे, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठीच प्रयत्न सुरु आहेत.

डॉ. वाय.ए.पठाण, उपायुक्त, पशुसंवर्धन