शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

खाडे यांना अटक करा

By admin | Updated: October 10, 2016 00:57 IST

महापालिका : पदाधिकाऱ्यांचा पोलिस ठाण्यात ठिय्या

कोल्हापूर : शिवाजी मार्केट प्रभाग समितीच्या सभेमध्ये कचरा उठाव करण्याच्या समस्येवर नगरसेविका माधवी गवंडी यांना उद्धट व लज्जा उत्पन्न होईल, असे अपशब्द वापरल्याने महापालिकेचे सहायक आयुक्त सचिन खाडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना तत्काळ अटक करा, या मागणीसाठी महापालिका पदाधिकाऱ्यांनी रविवारी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला. सहायक पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी खाडे यांच्यावर गुन्हा दाखल असून त्यांना पोलिस ठाण्यात हजर करा, यासंबंधी आयुक्त पी. शिवशंकर यांना पत्रव्यवहार करून पुढील कारवाई करू, असे आश्वासन दिल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. महापालिकेचे सहायक आयुक्त खाडे यांना प्रभाग समिती सभापतींच्या केबिनमध्ये कोंडून घालत धमकी दिल्याप्रकरणी नगरसेविका माधवी गवंडी यांचे पती, माजी नगरसेवक प्रकाश आनंदराव गवंडी यांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली होती. यावेळी गवंडी यांच्या पत्नीने लक्ष्मीपुरी पोलिसांत खाडे यांच्या विरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी खाडे यांच्याविरोधात ‘कलम ५०९’ प्रमाणे गुन्हा दाखल केला. पोलिसांनी प्रकाश गवंडी यांना तत्काळ अटक केली. सहायक आयुक्त खाडे यांना अटक न केल्याने महापालिकचे पदाधिकारी संतप्त झाले. रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास सर्वजण लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात आले. पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या केबिनमध्ये ठिय्या मांडत खाडे यांना अटक करा, अशी मागणी केली. सहायक पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण, उपनिरीक्षक डी. एम. गायकवाड यांनी पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला; परंतु संतप्त पदाधिकाऱ्यांनी खाडे यांना अटक न केल्याने महिला नगरसेवकावर अन्याय केला जात आहे. त्यांना पहिला अटक करा, मग तुमची चौकशी करा, अशी मागणी केली. त्यावर चव्हाण यांनी खाडे यांच्यावर गुन्हा दाखल आहे, त्यांना पोलिस ठाण्यात हजर करा, असे पत्र आयुक्तांना आज, सोमवारी सकाळी अकरापर्यंत दिले जाईल. त्यानंतर वरिष्ठांशी चर्चा करून कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. उपमहापौर शमा मुल्ला, स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव, अजिंक्य चव्हाण, राष्ट्रवादीचे गटनेते सुनील पाटील, शारंगधर देशमुख, महेश सावंत, सचिन पाटील, माधवी गवंडी, अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर, सरिता मोरे, वहिदा सौदागर, माजी नगरसेवक आदिल फरास, राजू लाटकर, नंदू मोरे आदी उपस्थित होते.