शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची सक्ती का ?

By admin | Updated: November 5, 2014 23:31 IST

प्राथमिक शिक्षक हवालदिल : निर्णयाबाबत फेरविचार करण्याची प्राथमिक शिक्षकांची मागणी

रवींद्र हिडदुगी - नेसरी -जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक शिक्षकांना मुख्यालयी राहण्याबाबतची खात्री करण्याचे परिपत्रक प्रत्येक शाळांना पाठविल्याने प्राथमिक शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत. शासनाच्या या निर्णयाने शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची सक्ती का? असा सवाल शिक्षक वर्गातून होत आहे.२९ आॅक्टोबर २०१४ रोजीच्या परिपत्रकामध्ये पंचायत समितीच्या सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेकडून प्राथमिक शिक्षकांनी मुख्यालयी राहण्याबाबतची खात्री करण्याची सूचना केली आहे. या परिपत्रकाच्या प्रती प्रत्येक शाळांच्या मुख्याध्यापकांच्या हाती पडल्याने मुख्यालये सोडून बाहेरगावी राहत असलेल्या शिक्षकांमधून या निर्णयाच्या विरोधात सूर निघत असून, संघटना पातळीवर या निर्णयाची अंमलबजावणी करण्याअगोदर पुनश्च एकदा फेरविचार करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. शाळेच्या ठिकाणी शिक्षक राहत नसल्याची ओरड करून जिल्हा परिषद शाळांतून गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळत नाही, असे म्हणणाऱ्यांनी याला जबाबदार असणाऱ्या शासनाविरोधात कधी आवाज उठविला होता का? शासन मागेल त्याला शाळा उघडण्याची परवानगी देऊन गरीब व बहुजन समाजातील विद्यार्थ्यांवर भविष्यात होणाऱ्या दूरगामी परिणामांचा कोणी आजवर विचार केलाय का? प्राथमिक शाळांचा दर्जा ढासळतोय, असा सार्वत्रिक प्रचार करून खासगी शाळांना अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन देण्याचे काम कोण करीत आहे? शिक्षकांना अनेक अशैक्षणिक कामात गुंतवून प्राथमिक शाळाच मोडीत काढण्याचा डाव शासन करीत असताना प्राथमिक शाळांचा दर्जा ढासळत आहे, असे म्हणणं कितपत योग्य आहे, अनेक प्रश्न शिक्षक वर्गातून व्यक्त होताना दिसत आहेत.राज्य प्राथमिक शिक्षक संघटना कोल्हापूर शाखेच्या वतीने जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना नुकतेच याबाबत निवेदन दिले आहे. त्यामध्ये शिक्षक हे शाळेच्या गावापासून ५ ते १० कि.मी. अंतरावर राहत असल्याने शाळेत पोहोचण्यास त्यांना १० ते १५ मिनिटे लागतात. शिवाय शिक्षकांची मुलेही राहत्या गावात घातलेली असतात. त्यामुळे त्यांचे अशा निर्णयामुळे कौटुंबिक स्वास्थ्य बिघडू शकते. सर्वच शिक्षक शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठीे कष्ट घेत आहेत. तेव्हा याबाबत फेरविचार करून शिक्षकांची मानसिकता कशी चांगली राहील याबाबतची विनंतीही निवेदनात केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक शाळांचा दर्जा आदर्शवत आहे. याच जिल्ह्याने ‘राजर्षी शाहू अभियान’सारखा गुणवत्तापूर्ण उपक्रम महाराष्ट्राला दिला. शैक्षणिक उठावांतून शाळांची अंतर्बाह्य जडणघडण याच जिल्ह्यात आढळून येते. असे असताना जिल्हा प्रशासनाने परिपत्रक काढून प्राथमिक शिक्षकांना मुख्यालयी राहण्याबाबतचे आदेश काढून एकप्रकारे अन्यायच होत असल्याची भावना शिक्षक वर्गातून होत आहे.