शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

आजरा नगरपंचायतीचे अंदाजपत्रक मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:36 IST

आजरा नगरपंचायतीच्या सन २०२१-२२ च्या १३ कोटी २१ लाख ३२ हजार ८७० रुपयांच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकास नगरसेवकांनी काही बदल सूचवून ...

आजरा नगरपंचायतीच्या सन २०२१-२२ च्या १३ कोटी २१ लाख ३२ हजार ८७० रुपयांच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकास नगरसेवकांनी काही बदल सूचवून मंजुरी दिली. अंदाजपत्रकात १८ लाखांच्या विशेष तरतुदी, १ लाख २५ हजारांच्या विशेष तरतुदी तर वेतन राखीव निधीवर ७ लाखांची तरतूद करण्यात आली. विशेष सभेत दुकान गाळ्यांची भाडेवाढ, वसुली यावरून नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. नगरपंचायतीचा १३ लाख ६५ हजार ८७० रुपयांचे शिलकीचे अंदाजपत्रक लेखाधिकारी प्रवीण पाटील यांनी मांडले. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी होत्या.

मुख्याधिकारी अजिंक्य पाटील यांनी स्वागत केले. लेखाधिकारी प्रवीण पाटील यांनी घटकनिहाय अंदाजपत्रक सादर केले. दुकान गाळ्यांचे भाडे किती जमा व किती खर्च झाले. मुदत संपलेल्या दुकान गाळ्यांची भाडेवाढ का केली नही, असा सवाल विरोधी नगरसेवक अभिषेक शिंपी यांनी केला. मुदत संपलेल्या दुकान गाळ्यांच्या भाडेवाढीसंदर्भात आजच नोटीस काढा असे नगरसेवक किशोर पारपोलकर व अनिरुद्ध केसरकर यांनी सांगितले.

ग्रामपंचायतीने ३० वर्षांपूर्वी दुकान गाळे बांधले. सुरुवातीचे १० वर्षे दुकान गाळ्यांसाठी पैसे दिले व त्यानंतर १० वर्षे व्यवहार म्हणून आहे त्यांनाच गाळे दिले; पण सध्या गाळे मालकांनी पोटभाडेकरू ठेवून जादा दराने भाड्याने दिले आहेत. भाडेवाढ झालीच पाहिजे, असे अशोक चराटी यांनी सांगितले. गाळ्यांसंदर्भात स्वतंत्र बैठक घेण्याचे उपनगराध्यक्ष विलास नाईक यांनी सांगितले.

अंदाजपत्रकात सुचविलेल्या विषयांमध्ये नगरसेवकांना प्रशिक्षण अभ्यास दौरा, श्रीमंत गंगामाई वाचन मंदिराच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी व भौतिक सुविधेसाठी निधीची उपलब्धता, नगरपंचायतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी अधिकाऱ्यांनी कोणते प्रयत्न केले, कर्मचाऱ्यांची वेतनवाढ झालीच पाहिजे, दुकान गाळेधारकांकडे असलेले थकीत भाडे वसुलीसंदर्भात नगरसेवकांनी सूचना केल्या. सामान्य लोकांचे घरफाळा थकीत राहिलेस डिजिटल फलकांवर नावे मग दुकान गाळेधारक थकीत राहिल्यास त्यांच्यावर काय कारवाई करणार ? असा सवालही करण्यात आला. अंदाजपत्रकाच्या सभेतून प्रमुख नगरसेवक अन्य ठिकाणच्या बैठकीसाठी निघून गेल्याने नगरसेविका शुभदा जोशी व शकुंतला सलामवाडेही निघून गेल्या. सभेत किरण कांबळे, संभाजी पाटील यांनीही अंदाजपत्रकात बदल सुचविले.