शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

महिला पोलीस अधिकारी नियुक्तीस हरताळ

By admin | Updated: May 29, 2017 00:33 IST

महिला पोलीस अधिकारी नियुक्तीस हरताळ

दीपक जाधव । लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी महिला अधिकाऱ्यांकडे द्या, असे राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांचे आदेश कागदावरच आहेत. राज्यात महत्त्वाच्या पदांवर महिला पोलीस अधिकारी यांची नियुक्ती झाली असताना कोल्हापूर जिल्हा मात्र त्याला अपवाद ठरला आहे. सक्षम व कर्तव्यदक्ष महिला अधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक डावलले जात असल्याची खंत जिल्ह्यातील वरिष्ठ महिला अधिकारी याच्यात आहे. सध्या मुंबईबरोबरच राज्यात वरिष्ठ पदांवर महिला पोलीस अधिकारी कार्यरत आहेत. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यात परिस्थिती वेगळीआहे. कोल्हापूर जिल्ह्यात सध्या ३० पोलीस ठाणी असून, यापैकी कळे पोलीस ठाण्यात फक्त महिला पोलीस अधिकारी पोलीस ठाण्याची जबाबदारी सांभाळत आहे. त्यांचीही येत्या काही दिवसांत बदली होणार आहे. मीना जगताप सोडल्या तर इतर अधिकारी पोलीस ठाण्याच्या प्रमुख नसल्या तरी विद्या जाधव या महिला अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध शाखेचा कार्यभार काही दिवसांपासून सांभाळत आहेत. त्यांच्याकडे कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्गचा कार्यभार येतो. याठिकाणी यशस्वीपणे काम पाहिलेल्या सहायक पोलीस निरीक्षक वैष्णवी पाटील याची नियंत्रक कक्षात बदली केली आहे. त्यांचा जिल्ह्यातील कार्यकाळ संपल्याने जिल्ह्याबाहेर बदली होण्याची शक्यता आहे. आरती नांद्रेकर या महिला कक्ष व विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी स्थापन केलेल्या निर्भया पथकाचे काम सक्षमपणे पाहत आहेत. पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांना विचारणा केली असता, ते म्हणाले, ‘पोलीस महासंचालकांच्या सूचना आल्या आहेत. त्यानुसार कळे, एमआयडीसी शिरोली या पोलीस ठाण्यांत जागा रिक्त होण्याची शक्यता आहे. याबाबत आस्थापना मंडळाच्या बैठकीत हा विषय ठेऊन निर्णय घेऊ.जिल्ह्यात ११ अधिकारीजिल्ह्यात सध्या एकूण ११ महिला अधिकारी आहेत. त्यात पाच वरिष्ठ अधिकारी आहेत; परंतु त्यांची ज्येष्ठता त्यांच्या नियुक्तींना अडथळा बनल्या आहेत. आर. जी. नदाफ, वैष्णवी पाटील, पुष्पलता मंडले, मीना जगताप, स्मिता काळभोर, आरती नाद्रेकर यांच्यासह ११ सहायक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.