शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
5
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
6
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
8
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
9
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
10
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
11
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
12
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
13
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
14
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
15
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
16
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
17
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
18
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
19
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
20
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
Daily Top 2Weekly Top 5

विभागीय क्रीडा उपसंचालकपदी सबनीस यांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:17 IST

कोल्हापूर : कोल्हापूर विभागीय क्रीडा उपसंचालक डाॅ. माणिकराव ठोसरे हे जानेवारी २०२१ मध्ये नियत वयोमानानुसार निवृत्त झाल्यामुळे रिक्त जागेवर ...

कोल्हापूर : कोल्हापूर विभागीय क्रीडा उपसंचालक डाॅ. माणिकराव ठोसरे हे जानेवारी २०२१ मध्ये नियत वयोमानानुसार निवृत्त झाल्यामुळे रिक्त जागेवर भंडारा, बुलढाण्याचे प्रभारी आणि अमरावतीचे क्रीडा उपसंचालक संजय सबनीस यांची क्रीडा व युवा सेवा संचालनालयाने नियुक्ती केली. ते पुढील आठवड्यात पदभार स्वीकारणार आहेत.

मूळचे अकोल्याचे असलेले सबनीस २००१ साली तालुका क्रीडा अधिकारी म्हणून क्रीडा व युवा सेवा संचलनालयात रुजू झाले होते. त्यानंतर २००५ साली ते बुलढाणा येथे जिल्हा क्रीडाअधिकारी झाले. त्यानंतर पुणे बालेवाडी येथे झालेल्या काॅमनवेल्थ गेमसाठी त्यांची नियुक्ती समन्वयक म्हणून करण्यात आली. एक उत्तम क्रीडा संघटक म्हणून त्यांनी स्पर्धेचे उत्तम नियोजन केले. या स्पर्धेनंतर त्यांची बालेवाडी क्रीडा संकुलात नेमणूक झाली. या दरम्यान त्यांनी ८ खेळांमधील भारतीय संघाचे ७० सराव शिबिरे यशस्वी पूर्ण करुन दाखविली.

चौकट

निवृत्त झालेले डाॅ. माणिकराव ठोसरे एक उत्तम वेटलिफ्टर म्हणून प्रसिद्ध होते. उपसंचालकपदाच्या दीड वर्षाच्या कालावधीत त्यांनी कोल्हापूरच्या विभागीय क्रीडा संकुलातील शूटिंग रेंज अद्ययावत करण्यासाठी ३ कोटी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला. या संकुलाच्या विकासासाठी आणखी ५ कोटी रुपयांच्या नव्या विकास निधीचा आराखडा क्रीडा मंत्रालयाला सादर केला. यात बॅडमिंटन हाॅल, निवासी संकुल आदीचा समावेश आहे. हा निधीही लवकरच क्रीडा संकुलाला मिळणार आहे.

फोटो : ३१०५२०२१-कोल-संजय सबनीस