शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

उत्पादन खर्चावर आधारित ऊसदर द्या

By admin | Updated: December 29, 2014 00:02 IST

एन. डी. पाटील : पाचरोजी सांगलीत मोर्चा

सांगली : शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या संघटना, चळवळींची दिशा भरकटत चालली असून, साखरेच्या किमतीवर उसाची किंमत ठरविण्याची चढाओढ लागली आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या घामाची किंमत मिळत नसून, ऊस उत्पादकाला उत्पादन खर्चावर आधारित दर मिळाला पाहिजे. यासाठी ५ जानेवारीस सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी दिली. ऊसदरप्रश्नी सांगलीतील कामगार भवनात बैठक झाली. यावेळी पाटील म्हणाले, शेतमालात शेतकऱ्याची गुंतवणूक असते. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित दर मिळणे अत्यावश्यक आहे. सध्या दरप्रश्नी भांडवलशाही मानसिकता असणारे कारखानदार एकमेकांतील मतभेद बाजूला ठेवून एकत्र येत आहेत. परंतु शेतकरी योग्य दर मिळाला पाहिजे, या मुद्द्यावर एकत्र येत नाहीत, हे दुर्दैव आहे. मागीलवर्षी उसाला जो दर होता, तो देखील यंदा मिळत नाही. भविष्यात साखरेचे भाव कोसळले तर उसाला मिळणाऱ्या दरात घसरण होणार का? हा प्रश्न आहे. साखरेच्या किमती कमी, जास्त करणे हे सरकारच्या हातात असल्याने उसाच्या उत्पादन खर्चावरच उसाची किंमत ठरविली पाहिजे, हा आपला मुद्दा असला पाहिजे. इंधनामध्ये इथेनॉलचा वापर केवळ १० टक्के जरी केला तरी त्याचा देशाला आणि पर्यायाने शेतकऱ्यांनाच लाभ होणार आहे; मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. ज्या कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर १९०० अथवा २००० रुपये जमा केले आहेत, त्यांनी त्वरित एफआरपीप्रमाणे रक्कम द्यावी, असे आवाहनही केले.अजित सूर्यवंशी यांनी, कॉँग्रेस आणि भाजप दोन्ही सरकारची शेतकऱ्यांप्रश्नी भूमिका सारखीच असल्याची टीका केली. भविष्यात एफआरपीप्रमाणे दर न देणाऱ्या कारखान्यांवर मोर्चा काढण्याचा निर्णयही यावेळी एकमताने घेण्यात आला. या बैठकीस जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे जे. पी. लाड, भास्कर चौगुले, शरद पाटील, व्ही. वाय. पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. (प्रतिनिंधी)पोपटाचा डोळा... महाभारतात द्रोणाचार्यांनी शिष्यांची परीक्षा पाहण्यासाठी झाडावर एक कृत्रिम पोपट ठेवून प्रत्येकाला त्याचा वेध घेण्यास सांगितले. परंतु केवळ अर्जुनाचेच लक्ष पक्ष्याच्या डोळ्यावर केंद्रित होते. त्याप्रमाणे शेतकऱ्यांचे लक्ष उत्पादन खर्चावर आधारित दर मिळण्यावर केंद्रित झाले, तर यश निश्चित मिळेल. कोणाच्या तरी वळचणीला उभे राहिले की अवस्था अवघड होते. त्यांना कोणी घरातही बोलावत नाही आणि कोणी विचारपूसही करीत नाही. चळवळीतल्या काहींनी वळचणीला राहून काय अवस्था होते, याचा चांगलाच अनुभव घेतला आहे, अशी टीका पाटील यांनी खा. राजू शेट्टी यांचे नाव न घेता केली.