शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

आयकर विभागाची वेबसाइट हँग होत असल्याने मनस्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:17 IST

विश्वास पाटील-लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : आयकर विभागाची नवी वेबसाइट वारंवार हँग होत आहेच, परंतु अनेक सुविधा अद्याप सुरूच ...

विश्वास पाटील-लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : आयकर विभागाची नवी वेबसाइट वारंवार हँग होत आहेच, परंतु अनेक सुविधा अद्याप सुरूच झाल्या नाहीत. त्याचा करदाते व करसल्लागारांना प्रचंड मनस्ताप होत आहे. त्याबद्दल देशभरातून तक्रारी आल्यानंतर आता वित्त मंत्रालय व वेबसाइट तयार करणाऱ्या इन्फोसिस कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक २२ जूनला होत आहे. त्यामध्ये येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा केली जाणार आहे.

देशात जेव्हा २०१७ मध्ये वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू केला तेव्हा त्यांनी नवीन वेबसाइट सुरू केली. ही वेबसाइट इन्फोसिसनेच तयार केली होती. ती आजही परिपूर्ण आणि पूर्ण क्षमतेने सुरू नाही. त्यामुळे करदाते आयकर विभागाची जुनी वेबसाइट किती चांगली आहे, असा दाखला आजही देत असत. आता नेमका त्याच्या उलटा अनुभव येत आहे. वित्त मंत्रालयाने यंदा नवीन वेबसाइट लाँँच करणार असल्याचे सांगितले. हे काम जुना अनुभव वाईट असताना पुन्हा इन्फोसिसलाच देण्यात आले. त्यासाठी ४२०० कोटी रुपये खर्च करण्यात आले. नवीन वेबसाइट येणार असल्याने १ ते ६ जून जुनी वेबसाइट बंद ठेवण्यात आली. ७ जून पासून ती एकदम जलद सुरू होईल, असे सांगण्यात आले होते. परंतु त्यादिवशी दिवसभर ती बंदच राहिली. रात्री १० नंतर ती कधीतरी ती सुरू झाली. त्यानंतर आता जून मध्यावर आला तरी अजूनही लवकर लॉगीन होत नाही, वारंवार हँग होणे, वेबसाइटवरील व्यवहार संथगतीने होणे अशा तक्रारी देशभरातून आल्या आहेत. त्याची नोंद घेऊन वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विट केले असून लोकांच्या तक्रारी लक्षात घेऊन वेबसाइटमध्ये तातडीने दुरुस्ती करण्याची सूचना त्यांनी केली आहे.

-------

कोणतेही नवी प्रणाली आणताना काही अडचणी येतात, परंतु त्याची अंमलबजावणी करण्याआधी योग्य चाचणी आणि तपासणी होणे गरजेचे असते. जीएसटीचा अनुभव वाईट असताना पुन्हा पूर्वतयारी न करता बदल केल्यामुळे करदात्यांना प्रचंड अडचणी येत आहेत. नवीन प्रणाली सुरू होईपर्यंत जुनी वेबसाइट सुरू ठेवावी.

- दीपेश गुंदेशा

चार्टर्ड अकौटंट, कोल्हापूर

(फोटो १६०६२०२१-कोल-दीपेश गुंदेशा-सीए)

वेबसाइटला गती नसल्याने कोणती कामे रखडली

१. आर्थिक वर्षाचे परतावा फाइल करण्याचे काम ३१ मार्चनंतर सुरू होते. यावर्षी जून संपत आला तरी ते करता आलेले नाही. त्यामुळे रिटर्न्स फाइल करण्याची मुदत ३१ जुलैऐवजी ३० सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे.

२. जुन्या वेबसाइटवरील मागील दहा वर्षांचे रिटर्न्स सहज डाऊनलोड होत होते. आता ते होत नाही.

३. आयकरसंबंधी तक्रारींच्या नोटीस व त्याचे खुलासेही देण्याचे काम ठप्प

४. टीडीएस रिटर्न्स भरण्याचे काम थांबले

५. विदेशातील पेमेंटसाठी बँकांना ऑनलाइन परवानगी लागते ती मिळण्यात अडचण

नवीन वेबसाइट : www.incometaxindia.gov.in

जुनी वेबसाइट : www.incometax.efiling.gov.in