शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

जयसिंगपुरात ‘अंकुश’चे महावितरणसमोर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:26 IST

जयसिंगपूर : ‘आंदोलन अंकुश’कडे तक्रार केलेल्या ग्राहकांच्या मागे वीजबिलाचा तगादा लावणार नाही, शिवाय तक्रारीचे निवारण होत नाही तोपर्यंत वीज ...

जयसिंगपूर : ‘आंदोलन अंकुश’कडे तक्रार केलेल्या ग्राहकांच्या मागे वीजबिलाचा तगादा लावणार नाही, शिवाय तक्रारीचे निवारण होत नाही तोपर्यंत वीज जोडणी तोडणार नाही, असे लेखी आश्वासन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर जयसिंगपुरातील ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आल्याची माहिती ‘आंदोलन अंकुश’चे धनाजी चुडमुंगे यांनी दिली. वीजबिलाची वसुली करताना महावितरणकडून ग्राहकांना दमदाटी केली जात आहे. अवास्तव व चुकीची बिले दुरुस्त न करताच ती भरण्यासाठी ग्राहकांच्या मागे तगादा लावला जात आहे. वीज जोडणी तोडण्याचीही धमकी दिली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी आंदोलन अंकुशने जयसिंगपूर - शिरोळ मार्गावरील महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले.

यावेळी आंदोलन अंकुशचे कार्यकर्ते व महावितरणचे अधिकारी यांच्यात मागण्यांबाबत चर्चा झाली. ज्या ग्राहकांनी आंदोलन अंकुशकडे तक्रारी दिल्या आहेत, त्यांनी जानेवारीअखेर थकीत वीजबिल भरु नये. या तक्रारींवर अंतिम निर्णय होत नाही, तोपर्यंत वीज जोडणी तोडण्यात येणार नसल्याचे आश्वासन महावितरणने दिल्याची माहिती चुडमुंगे यांनी दिली. या आंदोलनात आंदोलन अंकुशचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

फोटो - १५०२२०२१-जेएवाय-०६

फोटो ओळ - जयसिंगपूर - शिरोळ मार्गावरील महावितरण कार्यालयासमोर सोमवारी आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले.