शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

ऐच्छिक निधीबाबत नाराजी

By admin | Updated: March 17, 2016 00:53 IST

महापालिका : नगरसेवकांना हवा सहा लाख रुपयांचा निधी

कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाने नवीन अंदाजपत्रकातील तरतुदीद्वारे देऊ केलेल्या अडीच लाखांच्या ऐच्छिक निधीबाबत नगरसेवक कमालीचे नाराज असून पुढील आर्थिक वर्षात सर्व नगरसेवकांना प्रत्येकी सहा लाखांचा निधी तसेच उपनगरांतील नगरसेवकांना दोन लाखांचा अतिरिक्त निधी देण्याची सूचना केली आहे तसेच प्रशासनाला विसर पडलेल्या ज्येष्ठ विचारवंत अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या स्मारकासाठी नव्याने पाच लाखांची तरतूद करण्यात आग्रह नगरसेवकांनी धरला आहे. कोल्हापूर महानगरपालिकेचे सन २०१६-२०१७ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक आयुक्त पी. शिवशंकर यांनी नुकतेच स्थायी समिती सभेत सादर केले. आता स्थायी समिती सदस्य त्यांना असलेल्या अधिकारात फेरबदल करून महासभेत सादर करणार आहेत. गेल्या दोन दिवसांपासून स्थायी समिती सदस्यांनी अंदाजपत्रकात फेरफार करत होते. आज, गुरुवारी पुन्हा बैठक घेऊन त्याला मूर्त स्वरुप दिले जाणार आहे. महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने पुढील वर्षासाठी प्रत्येक नगरसेवकांना अडीच लाख रुपये ऐच्छिक निधी देण्याची प्रशासनाने तयारी दर्शविली होती; परंतु त्याबाबत नगरसेवकांत प्रचंड नाराजी आहे. त्याची दखल घेऊन स्थायी समितीने आता सरसकट सर्व नगरसेवकांना सहा लाखांचा ऐच्छिक निधी देण्याचा तर उपनगरांतील नगरसेवकांना अतिरिक्त दोन लाखांचा निधी द्यावा, असा आग्रह धरला आहे. प्रशासनाने नवीन कोणत्याही योजना राबविण्याच्या नाहीत, असा निर्णय घेतला आहे. ज्या जुन्या प्रलंबित योजना आहेत त्याच पूर्ण करण्यावर आयुक्त पी. शिवशंकर यांचा आग्रह आहे. मर्यादित उत्पन्न, त्यात सरकारकडून निधी मिळण्याची अपेक्षा कमी आणि प्रभागातील नागरिकांच्या विकासकामांबाबत असलेल्या अपेक्षा या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर नगरसेवकांना नाराजीच ओढावून घ्यावी लागणार आहे. त्यामुळेच स्थायी समितीसह सर्वच नगरसेवक ऐच्छिक निधी वाढवून घेण्याच्या विचारात आहे.महानगरपालिकेचे या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक आयुक्तांनी स्थायी समितीत सादर केले होते.आता स्थायी समिती सदस्य आपल्या अधिकारात फेरबदल करून महासभेत सादर करणार उपनगरांतील नगरसेवकांना दोन लाखांचा अतिरिक्त निधी देण्याची सूचना