शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लजला अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:21 IST

गडहिंग्लजला अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे धरणे * पेन्शनची मागणी : मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे घातले साकडे गडहिंग्लज : पेन्शनच्या मागणीसाठी गडहिंग्लज तालुक्यातील अंगणवाडी ...

गडहिंग्लजला अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे धरणे

* पेन्शनची मागणी : मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे घातले साकडे

गडहिंग्लज : पेन्शनच्या मागणीसाठी गडहिंग्लज तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी येथील प्रांत कचेरीसमोर शुक्रवारी धरणे आंदोलन केले. यावेळी पेन्शनसाठी मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे साकडे घालण्यात आले.

माजी आमदार अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे म्हणाले, नव्या पिढ्यांच्या जडणघडणीसाठी तुटपुंज्या मानधनावर आयुष्यभर राबणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासनाने पेन्शनच्या माध्यमातून वृद्धापकाळासाठी आधार द्यावा.

राज्य संघटक बाळेश नाईक म्हणाले, १० वर्षांच्या लढाईनंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवासमाप्तीचा लाभ मिळाला. परंतु, ही रक्कम म्हातारपणासाठी पुरेशी नाही. त्यामुळे अन्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महिन्याला पेन्शन मिळावी.

आंदोलनात जिल्हाध्यक्षा अंजना शारबिद्रे, राजश्री बाबाण्णावर, सुरेखा गायकवाड, भारती कुंभार, मंजुळा कोरवी, मालू केसरकर, सोना पाटील, सुवर्णा राऊत, माधवी देसाई, रेणुका शिरगावे, दीपाली पाटील, ममताज कदीम आदींसह अंगणवाडी सेविका व मदतनीस सहभागी झाल्या होत्या.

निवेदनातील मागण्या अशा :

* सेवानिवृत्त किंवा मृत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवासमाप्तीचा लाभ त्वरित मिळावा.

* शेवटच्या मानधनाच्या निम्मी रक्कम मासिक पेन्शन स्वरूपात तहहयात मिळावी, भविष्यात मानधन वाढ झाल्यास पेन्शनमध्येही वाढ व्हावी.

* ६० वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना उपजिल्हा रुग्णालयातून शारीरिक तंदुरुस्ती प्रमाणपत्र मिळावे.

----------------------------------

* फोटो ओळी :

गडहिंग्लज प्रांत कचेरीचे नायब तहसीलदार जीवन क्षीरसागर यांना श्रीपतराव शिंदे यांनी निवेदन दिले. यावेळी बाळेश नाईक, अंजना शारबिद्रे, राजश्री बाबाण्णावर आदींसह अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या.

क्रमांक : ०८०१२०२१-गड-०५