शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

सोनगडच्या दरीत सापडली प्राचीन शिवकालीन तोफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:28 IST

गारगोटी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात वसलेला एक दुर्लक्षित किल्ला म्हणजे किल्ले सोनगड. समुद्रसपाटीपासून ३५० मीटर उंचीवर वसलेला ...

गारगोटी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात वसलेला एक दुर्लक्षित किल्ला म्हणजे किल्ले सोनगड. समुद्रसपाटीपासून ३५० मीटर उंचीवर वसलेला हा किल्ला, याच्या माथ्याकडील कातळटोपीमुळे आपले लक्ष वेधून घेतो. या गडाच्या दरीत सुमारे १५०० फुटांवर किर्र जंगलात अनेक वर्षांपासून पडून असलेली एक तोफ शोधण्यात खानापूर ( ता. भुदरगड) येथील संघर्ष ग्रुप व मावळा प्रतिष्ठान, कोल्हापूरच्या युवकांना यश आले आहे. या युवकांनी गर्द झाडीतील मळलेल्या पायवाटेने ओबडधोबड कातळ कोरीव पायऱ्या चढून गडमाथा गाठला. तोफेचा शोध घेण्यासाठी हे मोजकेच मावळे दरीत उतरले. ही दरी दाट झाडीने व्यापली आहे. मात्र धाडस करत युवकांनी ही तोफ शोधून काढली. संघर्ष ग्रुप व मावळा प्रतिष्ठानच्या सदस्यांनी २४ एप्रिलला शोधमोहीम हाती घेतली व अवघ्या दोन दिवसांच्या मोहिमेत ही तोफ शोधून काढली.

या मोहिमेत दिलीप गुरव, वामन गुरव, किरण पाटील, कांतिभाई पटेल, प्रवीण तावडे, नील पटेल यांच्यासह मावळा प्रतिष्ठानचे सदस्य सहभागी झाले होते.

चौकट : अशी झाली शोधमोहिमेस सुरुवात

गारगोटीचे वनरक्षक किरण पाटील यांनी सोनगडच्या दरीत तोफ असल्याची माहिती कांतिभाई पटेल व प्रवीण तावडे यांना दिली. या दोन मावळ्यांनी २४ एप्रिलला या गडाच्या दरीत उतरून अथक्‌ प्रयत्नांनी या तोफेचा शोध घेतला. दरीमधून तोफ बाहेर काढण्यासाठी जागेची पाहणी केली व २८ एप्रिल रोजी प्रत्यक्ष तोफ बाहेर काढण्यास सुरुवात केली. काही दिवसांत ही तोफ मोठ्या दिमाखात गडमाथ्यावर आणली जाईल.

फोटो ओळ:

२८ एप्रिल रोजी दरीतून तोफ बाहेर काढताना संघर्ष ग्रुप व मावळा प्रतिष्ठानचे मावळे.