शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अमूलची ‘मस्ती’, साखरपट्ट्यात धास्ती!

By admin | Updated: September 23, 2016 00:39 IST

राज्य काबीज करण्याची व्यूहरचना : ४० लाख लिटर संकलनाचे उद्दिष्ट

राजाराम लोंढे --कोल्हापूर -देशात धवलक्रांतीची मुहूर्तमेढ रोवलेल्या ‘अमूल’ने आता मऱ्हाटी मुलुखात हातपाय पसरण्यास सुरुवात केल्याने राज्यातील दूध उद्योग ढवळून निघत आहे. शुगरबेल्ट असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातच मिल्कबेल्ट सर्वाधिक विकसित झाला असला तरी ‘अमूल’च्या तगड्या आव्हानामुळे दूध संघांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.‘अमूल’ने राज्यात १९९३ साली मुंबईत प्रथम पाऊल ठेवले. सध्या मुंबईसह पुणे, अहमदनगर, धुळे येथे रोज सव्वाचार लाख लीटर दूधसंकलन, तर तब्बल १६ लाख लिटरची विक्री सुरू आहे. आगामी काळात सात प्लॅँटच्या माध्यमातून महाराष्ट्र काबीज करण्याची व्यूहरचना त्यांनी आखली आहे. त्यातूनच राज्यातील सहकारी व खासगी दूध उद्योगाच्या दारात तीव्र स्पर्धा येऊन ठेपली आहे. सध्या मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे या वेगाने वाढणाऱ्या शहरांकडे त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी नागपूर येथे दोन लाख लिटर क्षमतेचा प्लॅँट घेतला आहे. खेड-पुणे येथे १० एकर जागा घेतली असून, येत्या दोन वर्षांत १० लाख क्षमतेचा प्लॅँट चालू करण्याचे नियोजन आहे. इगलो-मुंबई येथे केमिकल फॅक्टरीमध्ये चार लाख लिटर क्षमतेचा दूध प्लॅँट तयार करण्यास सुरुवात केली आहे. त्याबरोबरच मिल्कबेल्ट असणाऱ्या कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या ठिकाणीही घुसण्याची त्यांची तयारी सुरू आहे. कोल्हापुरातील ‘गोकुळ’ वगळता येथे आव्हान पेलू शकणारा एकही संघ सध्यातरी दिसत नाही. ‘मयूर’, ‘महालक्ष्मी’सह इतर बंद संघ ताब्यात घेण्याबाबत त्यांची चर्चा सुरू आहे. धास्तीचे मूळ गैरव्यवस्थापनात राजकीय व्यवस्थेनेच सहकारातील त्रिस्तरीय यंत्रणा संपविल्याने एकाच जिल्ह्यात चार-पाच तालुका संघ कार्यरत झाले. त्यात गैरव्यवस्थापनामुळे बहुतांश बंदही पडले. ‘गोकुळ’ वगळता एकाही संघाने उत्तम पशुखाद्य, उत्पादकांना वेळेत पैसे, आधुनिक संकलन व्यवस्था, जातिवंत जनावरांची पैदास यामध्ये भरीव काम केलेले नाही. त्यामुळे सर्वच दूध संघांना‘अमूल’ची धास्ती वाटू लागली आहे. गाईचे दूध ३२ रुपये !मुंबई मार्केटमध्ये इतर संघ गाईचे दूध ४० रुपये प्रतिलिटरने विक्री करतात; पण ‘अमूल’ १ लिटरची पिशवी ३२ रुपये प्रतिलिटरने विक्री करते. मार्केटमधील स्पर्धकाला कशा प्रकारे संपवायचे, याचे तंत्र त्यांच्याकडे आहे.