शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

अमृत देशमुख यांची बदली अखेर रद्द !

By admin | Updated: June 1, 2016 01:30 IST

मुख्यमंत्र्यांचे निर्देश : गोविंद पानसरे हत्या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस निरीक्षक

मुंबई : कॉ. गोविंदराव पानसरे हत्याकांडाच्या तपासात महत्वाची भूमिका बजावणारे कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमृत देशमुख यांची नागपूर येथे झालेली बदली अखेर रद्द करण्यात आली आहे.विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि कॉ. गोविंदराव पानसरे यांच्या कन्या कॉ. स्मिता पानसरे व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन देशमुख यांची बदली रद्द करण्याची मागणी केली. त्यानुसार ही बदली तत्काळ रद्द करण्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य करत तसे आदेश जारी केले. या शिष्टमंडळात भाकपचे राज्य सचिव कॉ. प्रकाश रेड्डी, मुंबई कार्यकारिणी सदस्य कॉ. प्रकाश नार्वेकर, कॉ. राजन बावडेकर, कॉ. अशोक सूर्यवंशी, अ‍ॅड. कॉ. बन्सी सातपुते, कॉ. हेमंत बुट्टे आदींचा समावेश होता. पानसरे हत्या प्रकरणाचा तपास अतिशय संवेदनशील व महत्वाच्या टप्प्यावर असताना सुरुवातीपासून या तपासात असणारे पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यांची बदली झाल्याने तपासावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता होती. ही बाब ध्यानात घेऊन दिवंगत कॉ. गोविंदराव पानसरे यांच्या कुटुंबियांनी व भारतीय कम्युनिष्ट पक्षाच्या शिष्टमंडळाने देशमुख यांची बदली रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली.तपासासाठी स्वतंत्र अधिकारी नेमणारपानसरे हत्याप्रकरणी सरकारने नेमलेल्या एसआयटीवर पूर्णवेळ व स्वतंत्र आयपीएस अधिकारी प्रमुख म्हणून नियुक्त करावा आणि त्यांच्या हाताखाली सक्षम पोलीस अधिका-यांचे पथक निर्माण करावे. त्याप्रमाणे या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत या पथकातील अधिका-यांची बदली करु नये, असेही शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. या मागणीलाही मुख्यमंत्र्यांनी सहमती दर्शवली.