शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

अंबाबाईचा आजपासून किरणोत्सव

By admin | Updated: November 9, 2016 01:14 IST

भौतिक अडथळ्यांबाबत उदासीनता

कोल्हापूर : प्राचीन वास्तुशास्त्राचा अजोड नमुना असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात आज, बुधवारपासून वर्षातील दुसऱ्या किरणोत्सवाला प्रारंभ होत आहे. दरवर्षी श्री अंबाबाईचा किरणोत्सव जानेवारी ३०, ३१ ते १ फेब्रु्रवारी तसेच ९, १०, ११ नोव्हेंबर असा वर्षातून दोनदा होतो. महाद्वारातून थेट मंदिरात आलेली किरणे पहिल्या दिवशी महालक्ष्मी मूर्तीच्या चरणांपर्यंत, दुसऱ्या दिवशी कमरेपर्यंत व तिसऱ्या दिवशी मुखावर येऊन किरणोत्सव पूर्ण होतो. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये करवीरनिवासिनी अंबाबाईच्या किरणोत्सवात तिसऱ्या दिवशी अर्थात किरणोत्सवाच्या शेवटच्या दिवशीही उंच इमारती, हवेतील प्रदूषण, वाढलेल्या झाडांच्या फांद्या, अशा अडथळ्यांमुळे किरणे देवीच्या कमरेपर्यंतच पोहोचली होती. त्यामुळे यंदा किरणोत्सव कुठपर्यंत पोहोचणार याची भाविकांमध्ये उत्सुकता आहे. भौतिक अडथळ्यांबाबत उदासीनता श्री अंबाबाई मंदिरात आज, बुधवारपासून किरणोत्सव सोहळा होत आहे. गेली अनेक वर्षे किरणोत्सव सोहळ्यादरम्यान भौतिक अडथळे दूर करण्याबद्दल अभ्यासकांकडून सूचना केल्या जातात. मात्र, प्रत्यक्षात त्या सूचनांचे पालन होत नसल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून आजही किरणोत्सवातील अडथळा कायम आहे. किरणोत्सव मार्गात वाढलेल्या इमारती, अतिक्रमणे, फलक, पाण्याची टाकी, झाडे, पत्र्याचे शेड यांमुळे देवीच्या किरणोत्सवात अडथळा निर्माण होत असून, तो दूर करणे आवश्यक आहे. मात्र किरणोत्सव सोहळ्यादरम्यान या भौतिक अडथळ्यांचा विषय केवळ चर्चेलाच येतो. प्रत्यक्षात ते दूर करण्याकामी प्रशासनाची उदासीनताच दिसून येत आहे. चरणांपर्यंत किरणेश्री अंबाबाई मंदिरात आज, बुधवारपासून किरणोत्सव सोहळा होत आहे. या पार्श्वभूमीवर अभ्यासकांनी मंगळवारी सायंकाळी पाहणी केली असता ही सूर्यकिरणे श्री अंबाबाई देवीच्या चरणांपर्यंत पोहोचली व विरळ झाली. आता आज, बुधवारपासून किरणोत्सवाचा मुख्य दिवस असल्याने त्याबाबत भाविक व अभ्यासक यांच्यामध्ये मोठी उत्सुकता आहे.