शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाई मंदिर सुरक्षेबाबत दक्ष रहा

By admin | Updated: June 10, 2015 00:27 IST

जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : फेरीवाल्यांचा निर्णय संयुक्त पाहणीनंतर घेणार

कोल्हापूर : अंबाबाई मंदिराच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने अमलात आणाव्यात. पोलीस प्रशासन, देवस्थान समिती यांनी सुरक्षेच्या बाबतीत दक्ष रहावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत केल्या. फेरीवाल्यांचे प्रश्न, तसेच पार्किंग सुविधासंदर्भात संयुक्त पाहणीनंतर निर्णय घेण्याचे या बैठकीत ठरले. जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांनी मंगळवारी दुपारी अंबाबाई मंदिर सुरक्षिततेचा आढावा, तसेच पुढील काळात करायच्या उपाययोजनांबाबत बैठक झाली. या बैठकीस मनपा आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल देशमुख, वाहतूक शाखेचे निरीक्षक आर. आर. पाटील, मनपा नगर अभियंता नेत्रदीप सरनोबत, ‘देवस्थान’च्या सचिव शुभांगी साठे, फेरीवाला कृती समितीचे दिलीप पोवार, अशोकराव भंडारे, नंदकुमार वळंजू, रमाकांत उरसाल, सुरेंद्र शहा, भाऊसाहेब गणपुले, समीर नदाफ, आदी उपस्थित होते. मंदिराच्या सुरक्षेबाबत सीसीटीव्ही यंत्रणा अपडेट करण्याच्या, तसेच आवश्यक तेथे जादा कॅमेरे बसविण्याच्या सूचना दिल्या. त्यासाठी आवश्यक निधी देण्यात येईल, असे डॉ. सैनी यांनी सांगितले. येथील मान्यताप्राप्त पुजाऱ्यांना नवीन ओळखपत्रे देण्याचे बैठकीत ठरले. (प्रतिनिधी)संयुक्त पाहणीचा निर्णयमंदिराभोवतालचे फूलविक्रेते, फेरीवाले यांना २०० मीटर अंतरापर्यंत हटविता येईल का? यावर चर्चा झाली. परंतु, चर्चेनंतर या विक्रेत्यांना आहे तेथे थोडे अधिक अंतरावर त्यांची कशी सोय करता येईल, हे ठरविण्यासाठी संयुक्त पाहणी करून निर्णय घेण्याचे बैठकीत ठरले. मंदिराभोवती पार्किंगसाठी अन्य कोणत्या करता येतील, याची पाहणी करण्याचेही यावेळी ठरले. खासगी सुरक्षारक्षकांना प्रशिक्षण अंबाबाई मंदिरात पोलिसांबरोबरच देवस्थान समितीचे खासगी सुरक्षारक्षक बंदोबस्तास असतात. परंतु, त्यांना विशेष असे प्रशिक्षण देण्याचा मुद्दा चर्चेत आला. त्यावेळी आवश्यक ते सर्व प्रकारचे प्रशिक्षण त्यांना देण्यात यावे, अशी सुचना डॉ. सैनी यांनी केली.