शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

जीवनात नेहमी आशावाद बाळगा

By admin | Updated: January 16, 2016 00:44 IST

सुधाताई कुलकर्णी : पसायदानातून चांगल्या जगण्याची शिकवण--वि. स.खांडेकर व्याख्यानमाला

कोल्हापूर : जीवन हे सुंदर आहे, असा आशावाद नेहमी बाळगायला हवा. वाईट कल्पना नष्ट करा, चांगले जगायला शिका, असा सल्ला ज्ञानेश्वरी व भगवद्गीता अभ्यासक, सेवानिवृत्त शिक्षिका सुधाताई कुलकर्णी यांनी शुक्रवारी दिला. त्या करवीरनगर वाचन मंदिर येथे पद्मभूषण कै. वि. स. तथा भाऊसाहेब खांडेकर व्याख्यानमालेत ‘पसायदान’ या विषयावर बोलत होत्या. अध्यक्ष राजाभाऊ जोशी अध्यक्षस्थानी होते.सुधाताई कुलकर्णी यांनी, सातशे वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वर यांच्या पसायदानातील जीवन कसे जगले पाहिजे, ते कसे असावे, याबद्दलचे विचार मांडले. आपल्या सहवासातील माणसांना प्रेम, शांती दिली तर त्याचा नक्की चांगला उपयोग होतो. मित्र-मैत्रिणींबरोबर मनातील गोष्टी व्यक्त करतो. पण सत्ता, संपत्ती व बळाच्या जोरावर आपण अधिकार गाजवतो. पण, ते चुकीचे आहे. त्या म्हणाल्या, समाजातील नेतेमंडळींनी ‘लोकरक्षण’ आणि ‘लोकशिक्षणा’चे कार्य केले पाहिजे. तरच आपले कार्य सत्कारणी लागले असे म्हणता येईल. इतरांनाही बरोबर घेऊन जाणे हा गुणधर्म असला पाहिजे. नीतीमूल्य असतील तर आपण समाजाचा रथ ओढू शकतो. जीवनशैली सुदृढ असेल तर आरोग्याचे विकार होत नाहीत. संत ज्ञानेश्वरांचे विचार हे निष्ठेचे होते. त्यांचा पारायण सप्ताह मनाची श्रद्धा, मन कसे शांत ठेवावे यासाठी करतो. त्यासाठी संत ज्ञानेश्वर यांच्या ओव्यांचा अभ्यास करावा. त्यातून जीवनाचा खरा अर्थ समजेल. सतीश कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. नंदकुमार मराठे यांनी सूत्रसंचालन केले. ग्रंथपालक मनीषा शेणई यांनी आभार मानले.