शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
9
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
10
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
11
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
12
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
13
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
14
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
15
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
16
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
17
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
18
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
19
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
20
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा

सेनेने पाठिंबा काढला तरी सत्तेची व्यवस्था

By admin | Updated: May 22, 2016 00:56 IST

चंद्रकांतदादा पाटील : हसन मुश्रीफ पुढीलवेळी कागलचे आमदार होणार नसल्याचा केला दावा

गारगोटी : जाणूनबुजून हेतूपुरस्सर माझ्यावर टीका करणारे हसन मुश्रीफ पुन्हा कागलचे आमदार होणार नाहीत याची आम्ही पूर्ण तयारी केली असून, याच भीतीपोटी ते माझ्यावर टीका करतात की काय? कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांशी ठिकाणी भाजपचे आमदार मी करणार आहे, असे परखड मत पालकमंत्री व बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले. त्याचवेळी त्यांनी शिवसेनेने पाठिंबा काढला तरी पाच वर्षे सरकार टिकवण्याची व्यवस्था केली असल्याचे ते म्हणाले. भुदरगड तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा गारगोटी (ता. भुदरगड) येथे इंजुबाई सांस्कृतिक सभागृहात आयोजित केला होता, त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गोकुळ दूध संघाचे संचालक बाबा देसाई होते. भाजप तालुका अध्यक्ष नाथाजी पाटील, मौनी विद्यापीठ सदस्य अलकेश कांदळकर, प्रा. एच. आर. पाटील प्रमुख उपस्थित होते.पाटील म्हणाले, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका थोड्याच कालावधीमध्ये लागणार असून, प्रत्येक जिल्हा परिषद व पंचायत समितीनुसार इच्छुक उमेदवारांनी तयारीला लागावे. कोणी कितीही वल्गना केल्या तरी किंवा शिवसेनेनेही जरी पाठिंबा काढून घेतला तरी पर्यायी व्यवस्था मी व मुख्यमंत्र्यांनी केलेली असल्यामुळे भाजपचे सरकार पाच वर्षांचा काळ पूर्ण करेल. कार्यकर्त्यांनी त्याची चिंता करू नये.शासनाच्या विविध योजना आम्ही राबवीत असून, कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन लोकांच्यात त्यांचा प्रसार करावा. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आपल्यासोबत आणखी एक मजबूत मित्र येणार असल्यामुळे कार्यकर्त्यांनी एकसंधपणे निवडणुकांना सामोरे जावे, विजय आपलाच आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.‘गोकुळ’चे संचालक बाबा देसाई म्हणाले, मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या भगीरथ प्रयत्नामुळेच भाजपचे यश जिल्ह्यात दिसू लागले आहे. आमदार मुश्रीफ कितीही आरडाओरडा करू देत, भाजप पूर्ण जिल्ह्यातील गावागावांत आणि घराघरांत पोहोचणार आहे. भुदरगड भाजपचे तालुका अध्यक्ष नाथाजी पाटील म्हणाले, येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीबरोबरच भाजप गारगोटी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पूर्ण तयारीनिशी उतरणार आहे. मौनी विद्यापीठाचे सदस्य अलकेश कांदळकर म्हणाले, शत-प्रतिशत भाजप करण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे. प्राचार्य मोरस्कर, योगेश परुळेकर, आदींनी मनोगते व्यक्त केली. व्यासपीठावर संतोष पाटील, नामदेव चौगले, आदी उपस्थित होते. कार्यकर्त्यांची गर्दीसहकाराला राजकीय अड्डा बनविल्यामुळे मेळाव्याच्या ठिकाणी कार्यकर्त्यांना आणण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी चारचाकींचा ताफा उभा करते. मात्र, गेल्या दोन वर्षांत भाजपने दखल घेण्याइतपत आघाडी घेतली असून, आजच्या मेळाव्याला सभागृहात भरगच्च गर्दी ओसंडून वाहत होती. विशेष म्हणजे भाजपच्या मेळाव्याला दुचाकी वाहनांची गर्दी होती.