शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

रेमडेसिविरचा कंपन्यांकडून पुरवठा तरी नातेवाईक वेठीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:25 IST

कोल्हापूर : जिल्ह्यातील मोठ्या खासगी रुग्णालयांना कंपन्यांकडून रेमडेसिविर इंजेक्शनचा थेट पुरवठा होत असतानादेखील त्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांना वेठीस धरण्याचे प्रकार ...

कोल्हापूर : जिल्ह्यातील मोठ्या खासगी रुग्णालयांना कंपन्यांकडून रेमडेसिविर इंजेक्शनचा थेट पुरवठा होत असतानादेखील त्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांना वेठीस धरण्याचे प्रकार होत आहेत. आपला माणूस वाचावा म्हणून नातेवाईक धावपळ आणि जीवाचे रान करत नियंत्रण कक्षाकडे इंजेक्शनची मागणी करत आहेत, वस्तुस्थितीत मात्र काही रुग्णालयांकडूनच इंजेक्शनची साठेबाजी होत असल्याचे प्रशासनाला आढळले आहे.

कोरोना रुग्णांना देण्यात येणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचा सध्या मोठ्या प्रमाणात तुटवडा असून, त्याचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातच नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहे. येथे सर्व रुग्णालयांकडून रोज इंजेक्शनची मागणी केली जाते. दिवसाला २ हजार इंजेक्शनची मागणी असताना १०० ते २०० च्या पटीत त्यांचा पुरवठा होत आहे. त्यातूनच सर्व रुग्णालयांना तो पाठवला जातो. एकीकडे रात्रंदिवस नियंत्रण कक्षाकडून ही सेवा बजावली जात असताना दुसरीकडे काही रुग्णालयांमधून साठेबाजी होत असल्याचे दिसून आले आहे.

गेल्यावर्षी रेमडेसिविरची मागणी सुरू झाल्यानंतर अनेक मोठ्या रुग्णालयांनी थेट इंजेक्शन निर्मिती करणाऱ्या कंपनीशी संपर्क साधून इंजेक्शनचा पुरवठा करावा, अशी मागणी केली होती. त्यांना कंपनीकडून कोडनंबरदेखील देण्यात आला आहे. अशारीतीने रोज या रुग्णालयांना ३० ते ४० इंजेक्शनचा थेट पुरवठा केला जातो. याची यादी रोज जिल्हा प्रशासनाकडे येत असते. असा थेट पुरवठा होत असतानादेखील रुग्णालयांकडून नियंत्रण कक्षाकडे इंजेक्शनची मागणी केली जाते.

नियंत्रण कक्षाकडून वैयक्तिकरीत्या इंजेक्शनचा पुरवठा केला जात नसताना रुग्णाच्या नातेवाइकांना इंजेक्शन आणण्यासाठी पळवले जाते. नातेवाईक नियंत्रण कक्षाकडे ही चिठ्ठी घेऊन येतात व इंजेक्शन मिळवण्यासाठी याचना करत असतात. नाहीतर मग काळ्याबाजारातून त्याची खरेदी होते किंवा मग रुग्णालयाकडूनच ते जास्त रकमेने विकत दिले जाते. नियंत्रण कक्षाला केवळ ३ टक्के इतका रेमडेसिविरचा पुरवठा होत आहे. अशा परिस्थितीत ज्या रुग्णालयांना थेट कंपनीकडून पुरवठा होत नाही त्यांना इंजेक्शन देण्यासाठी प्राधान्य देणे गरजेचे असताना मोठ्या रुग्णालयांकडून इंजेक्शनची साठेबाजी होत असल्याचे प्रशासनाला आढळले आहे.

---