शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना विमा धनादेशाचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोनामुळे मृत्यू झालेले जिल्हा बँकेचे कर्मचारी व गट सचिवांच्या वारसांना सोमवारी विमा धनादेशाचे बँकेचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोरोनामुळे मृत्यू झालेले जिल्हा बँकेचे कर्मचारी व गट सचिवांच्या वारसांना सोमवारी विमा धनादेशाचे बँकेचे अध्यक्ष, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले.

बँकेने भारतीय आयुर्विमा महामंडळाबरोबर करार करून विमासुरक्षा योजना लागू केला असून कर्मचाऱ्यांचा कोरोनासह इतर आजाराने मृत्यू झाल्यास २१ लाख रुपये व कल्याण निधीतून दोन लाख अशी २३ लाखांची मदत दिली जाते. आतापर्यंत शेती कर्ज विभागाचे उपव्यवस्थापक माधवराव रणवरे, अकाउंट्स विभागाचे उपव्यवस्थापक कुमार पाटील, ब्रॅच अकाउंटट याकूब नदाफ, शाखाधिकारी सुभाष पाटील, कॅशियर भीमराव कणेरकर, क्लार्क मुनीर इलाई बाणदार यांच्या वारसदारांना विमा धनादेशांचे वाटप करण्यात आले. बँकेने जिल्हा गटसचिव केडरच्या सहयोगातून सचिवांच्या वारसदारांना पाच लाख रुपयांची विमा सुरक्षा योजना लागू केली होती. त्याअंतर्गत भामटे येथील केदारलिंग संस्थेचे सचिव अमर कोईगडे (सडोली दुमाला) व कोवाड सेवा संस्थेचे सचिव मारुती पाटील यांच्या वारसदारांना विमा धनादेशाचे वाटप केले. या वेळी ज्येष्ठ संचालक महादेवराव महाडीक, आमदार पी. एन. पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील, पी. जी. शिंदे आदी उपस्थित होते.

पाच लाखांचा शेतकरी अपघात विमा उतरणार

बँकेने सलग दोन वर्षे शेतकऱ्यांचा अपघाती विमा उतरवला होता. गेल्या वर्षी भारती ॲक्सा इन्शुरन्स कंपनीला ८९ लाख रुपये देऊन अडीच लाख शेतकऱ्यांचा अपघाती विमा उतरवला होता. गेल्या वर्षभरामध्ये ४४ शेतकऱ्यांचे अपघाती मृत्यू झाल्याने त्यांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाखांप्रमाणे ८८ लाख रुपयांची भरपाई मिळाली. बँकेला नफ्यावरील करापोटी वर्षाला २० ते ३० कोटी द्यावे लागतात, त्यासाठी कोणत्याही कारणाने शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याला तीन ते पाच लाखांपर्यंतची भरपाई मिळावी, अशी विमा योजना सुरू करणार आहे. बँकेचे ज्येष्ठ संचालक अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखालील समिती त्यांनी याबाबत लवकर निर्णय घ्यावा, असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

फोटो ओळी : जिल्हा बँकेचे कर्मचारी याकूब नदाफ यांच्या वारसांना विमा सुरक्षा रक्कमेचा धनादेशाचे वाटप बँकेचे अध्यक्ष, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी राजेश पाटील, अनिल पाटील, राजेंद्र पाटील-यड्रावकर, महादेवराव महाडीक, पी. एन. पाटील आदी उपस्थित होते. (फाेटो-३१०५२०२१-कोल-केडीसीसी)