शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

सर्व परवानग्या पावसाळ््यात मार्गी

By admin | Updated: June 17, 2015 00:38 IST

आयुक्त : थेट पाईपलाईनबाबत सोमवारी ‘वन्यजीव’च्या परवानगीसाठी मुख्यमंत्र्यांची बैठक

कोल्हापूर : शहरवासीयांचे गेल्या तीन दशकांचे स्वप्न असलेली काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना वन्यजीव, वनविभाग, जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परवानगीच्या प्रतीक्षेत आहे. यातील ‘वन्यजीव’च्या परवानगीसाठी सोमवारी (दि. २२) राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक होत आहे. यानंतर प्रस्ताव केंद्राकडे जाईल. दरम्यान, इतर शासकीय परवानग्या येत्या तीन महिन्यांत पूर्ण करु. ठरलेल्या वेळेत पाईपलाईनचे काम पूर्ण होईल, अशी माहिती आयुक्त पी. शिवशंकर यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी मंगळवारी बोलताना दिली.पाईपलाईनसाठी केंद्र व राज्याचा निधी उपलब्ध होऊनही हे काम विविध शासकीय परवानग्यांच्या त्रांगड्यात अडकल्याने वेळेत सुरू झाले नाही. आता योजनेचा सध्याचा खर्च ४८९ कोटी रुपयांवर गेला. वाढलेल्या ६० कोटी खर्चाची जमवाजमवही महापालिकेने केली. मात्र, वन्यजीव विभागाची परवानगी नसल्याने योजनेचे काम प्राथमिक टप्प्यात थांबवावे लागले होते. मात्र, ‘वन्यजीव’च्या परवानगीचा खडतर मार्ग सुकर होण्याची चिन्हे आहेत. मुख्य वन्यजीव संरक्षक व राधानगरीतील स्थानिक अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार मुंबईतील अप्पर प्रधान मुख्य वन संरक्षकांच्या अभिप्रायाने नागपूर येथील प्रधान मुख्य वन संरक्षकांनी पाईपलाईनला हिरवा कंदील दाखविला. सोमवारी राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाची मोहोर उमटण्याची शक्यता आहे. त्यानंतर केंद्र शासनाच्या ‘नॅशनल बोर्ड फॉर वाईल्ड लाईफ’ यांच्या अंतिम संमतीसाठी प्रस्ताव सादर केला जाणार आहे.पहिल्या टप्प्यात महापालिकेने २१ किलोमीटरसाठी वन विभाग, जिल्हा परिषद, पाटबंधारे विभाग व पीडब्ल्यूडीकडे जागा ताब्यात देण्यासाठी प्रस्ताव पाठविला आहे. या परवानग्या स्थानिक पातळीवरील असतानाही यास निव्वळ राजकीय कारणास्तव विरोध होत असल्याची चर्चा आहे. पाटबंधारे विभागाने ‘प्रस्ताव पे प्रस्ताव’ प्रकार सुरू केला आहे; तर जिल्हा परिषदेने नागाळा पार्कातील सभागृहाच्या वाढीव बांधकामाच्या परवानगीसाठी पाईपलाईनचे काम अडकवून ठेवल्याची चर्चा आहे. पावसाळ््यानंतर पाईपलाईनाच्या कामास गती येईल. काम वेळेत पूर्ण होईल, असा विश्वास आयुक्तांनी यावेळी व्यक्त केला. वनविभागाची परवानगी अंतिम टप्प्यात आहे. इतर विभागांच्या परवानगीसाठी पावसाळ्याच्या कालावधीत जोरदार प्रयत्न केले जातील. आतापर्यंत दीड किलोमीटर पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. पावसाळ्यानंतर पाईपलाईनच्या कामास गती आलेली दिसेल. - पी. शिवशकंर, आयुक्त माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील व कॉँग्रेसचे नगरसेवक आज, बुधवारी थेट पाईपलाईन कामाचा आढावा घेणार आहेत. कामाची गती व येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक पाईपलाईनच्या कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन माहिती घेणार आहेत.