शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
3
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
4
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
5
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
6
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
7
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
8
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
9
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
10
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
11
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
12
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
13
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
14
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
15
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
16
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
17
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
18
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
19
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
20
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
Daily Top 2Weekly Top 5

आळवेतील गुरुजी देत आहेत इंधन बचतीचा संदेश

By admin | Updated: May 30, 2017 00:28 IST

दररोज बारा किलोमीटरचा प्रवास : गेल्या नऊ वर्षांपासून नियमितपणे सायकलचा वापर

विक्रम पाटील ।  लोकमत न्यूज नेटवर्क  -करंजफेण : पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी, आरोग्य चांगले राखण्यासाठी व वाहतुकीच्या कोंडीवर नियंत्रण राहण्यासाठी सायकलच्या वापराचा पर्याय योग्य मानला जात असला, तरी आज लोक फर्लांगभर जाण्यासाठीसुद्धा मोटारसायकलचा वापर करीत असल्याची वास्तवता समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळते. चारचाकीची ऐपत असली तरी सायकलनेच आॅफिसला जाणारे लोक तुरळकच पाहायला मिळतात. त्यामधील एक उदाहरण म्हणजे मूळचे आळवे (ता. पन्हाळा) येथील जि. प.चे पदवीधर अध्यापक विलास आनंदा कुंभार हे ठरत आहेत.मागील दहा वर्षांमागील चित्र पाहता सायकलला अनन्यसाधारण महत्त्व होते. सायकल म्हणजे प्रतिष्ठेची बाब समजली जात होती; पण आज वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या आल्यामुळे सायकल संस्कृती मागे पडू लागली आहे. त्याचा मानवाच्या आरोग्याच्या दृष्टीने, पर्यावरणाच्या प्रदूषणाच्या दृष्टीने व इंधन बचतीच्या बाजूने विचार केला असता शासनाला जनजागृती करण्याची गरज भासू लागली आहे.हा सर्व विचार आत्मसात करून १५ आॅगस्ट २००७ पासून कुंभार यांनी ठरवले की, आठवड्यातून कमीत कमी तीन वेळा तरी शाळेला सायकल घेऊन जायचे. नंतर त्यांनी नियमितपणे शाळेला सायकलवरून जायची सवय लावून घेतली. कारण सायकल चालविणे हा उत्तम प्रकारे व्यायाम आहे आणि एक पर्यावरणपूरक कृती आहे. हे जरी खरे असले तरी आॅफिसला सायकल घेऊन जाणे म्हणजे समाजाच्या दृष्टीने एक हास्यास्पद बाब आहे याची जाणीव असूनदेखील त्यांनी गेल्या नऊ वर्षांपासून नियमितपणे सायकलने शाळेला जाण्याचे एक व्रतच अंगी जोपासले आहे. त्यांच्या सेवेची सुरुवात १९९० साली भाडळे (ता. शाहूवाडी) या गावापासून झाली. सुरुवातीला ते मोटारसायकलचा वापर करत होते, परंतु त्यांच्या मनात विचार आला की, सायकल चालविणं एक उत्तम प्रकारचा व्यायाम आहे. त्याबरोबरच एक पर्यावरणपूरक कृती आहे. तरी हे सर्व आपण पुस्तकी वाचण्यापुरते मर्यादित न ठेवता आपल्यापासून आत्मसात करण्याची खरी गरज आहे. त्यांनी गेल्या नऊ वर्षांमध्ये कोलोली, दिगवडे या ठिकाणी सेवा बजावताना सायकलची साथ सोडलेली नाही. आता ते करंजफेण (ता. पन्हाळा) या ठिकाणी पदवीधर शिक्षक म्हणून सेवा बजावत असले तरी दररोजचा १२ कि.मी.चा प्रवास ते नियमितपणे सायकलनेच करत आहेत.गेल्या नऊ वर्षांपासून मी प्रवासादरम्यान नियमित सायकलचा वापर करत आहे. त्यातून मला काहीही सिद्घ करायचे नव्हते अन् नाही, परंतु व्यायामातून मिळणारी सुखद अनुभूती मला अनुभवायला मिळत आहे. त्याबरोबर पर्यावरण उपक्रमात प्रदूषण व इंधन बचतीसाठी आपला थोडा का असेना सहभाग असल्याने मला मोठा अभिमान वाटत आहे. - विलास कुंभार