शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

आजरा अर्बन बॅंक निवडणूक बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:02 IST

कोल्हापूर : महाराष्ट्रातील अग्रगण्य असलेल्या आजरा अर्बन बॅंकेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आहे. अर्ज माघारी ...

कोल्हापूर : महाराष्ट्रातील अग्रगण्य असलेल्या आजरा अर्बन बॅंकेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आहे. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी १८ जागांसाठी तितकेच अर्ज शिल्लक राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, उद्या (बुधवारी) दुपारी ३ वाजता आजरा येथे होणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये बिनविरोधची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.

काशिनाथ चराटी आणि माधवराव देशपांडे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने या बॅंकेची स्थापना केली. आजऱ्यासारख्या ग्रामीण भागामध्ये स्थापन झालेली ही बॅंक अल्पावधीत महाराष्ट्रातील अग्रगण्य बॅंक म्हणून नावारूपाला आली. आजरा, कोल्हापूरसह कोकण आणि पुणे, मुंबई, कर्नाटकात असलेल्या शाखा, मल्टिस्टेटचा मिळालेला दर्जा या सर्व पार्श्वभूमीवर बॅंकेने आजरा तालुक्याच्या विकासात मोठी भूमिका बजावली. याच बळावर जनता शिक्षण संस्था आणि आण्णा भाऊ सूतगिरणी स्थापन करण्यात आली.

काशिनाथ चराटी आणि माधवराव देशपांडे यांच्या निधनानंतरची ही तिसरी पंचवार्षिक निवडणूक होती. पहिल्या दोन निवडणुका झाल्या होत्या. त्यामुळे दुसऱ्या निवडणुकीकडे साऱ्यांचे लक्ष होते. परंतु, आण्णा भाऊ संस्था समूहाचे नेते अशोक चराटी यांनी एकहाती निर्णय घेत सत्तारूढ आघाडीची रचना केली. विरोधी तीन इच्छुक छाननीमध्ये अपात्र ठरले आणि सोमवारी अर्ज माघारीदिवशी १८ जागांसाठी तितकेच अर्ज शिल्लक राहिले. त्यामुळे चराटी यांच्या नेतृत्वाखाली सत्तारूढ आघाडीने अतिशय सफाईदारपणे ही निवडणूक बिनविरोध करण्यात यश मिळवले. यावेळी विभागीय उपनिबंधक अरूण काकडे यांनी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. काकडे आता बुधवारी दुपारी ३ वाजता बॅंकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे अधिकृतपणे जाहीर करतील.

कोट

सभासदांच्या पाठबळामुळेच बिनविरोध

आजरा अर्बन बॅंकेचे हजारो सभासद आणि माझ्या सहकाऱ्यांच्या पाठबळावरच ही निवडणूक आम्ही बिनविरोध करू शकलो. याच बळावर आम्ही बॅंकेची वेगळी ओळख निर्माण केली आहे. यापुढील काळातदेखील सर्वांच्या सहकार्याने बॅंक शेड्युल्ड करण्याचा आमचा मानस आहे.

- अशोक चराटी

प्रमुख, आण्णा भाऊ संस्था समूह, आजरा

चौकट

आजरा अर्बन बॅंक दृष्टीक्षेपात

भागभांडवल १७ कोटी ४६ लाख रुपये

स्वनिधी ७८ कोटी ४० लाख रुपये

ठेवी ७०६ कोटी ४० लाख रुपये

कर्जे ३८७ कोटी ८८ लाख रुपये

गुंतवणूक ३८२ कोटी ८० लाख रुपये

ढोबळ नफा १२ कोटी २३ लाख रुपये

सभासद ३३,१६४

शाखा ३२

फोटो

आजरा अर्बन बॅंक या नावाने फोटो टाकले आहेत.