शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

आजरा पोलिसांनी ९ लाख ७५ हजारांची पकडली गोवा बनावटीची दारू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:18 IST

आजरा : गोवा बनावटीची ९ लाख ७५ हजार १३२ रुपयांची दारू टाटा कंपनीच्या ट्रकच्या मागील हौदातील कप्प्यातून आणताना आजरा ...

आजरा : गोवा बनावटीची ९ लाख ७५ हजार १३२ रुपयांची दारू टाटा कंपनीच्या ट्रकच्या मागील हौदातील कप्प्यातून आणताना आजरा पोलिसांनी अहमदनगरच्या दोघांना दारूसह पकडले. कारवाई आजरा-आंबोली रस्त्यावरील हॉटेल तुळशीसमोर रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी टेम्पो-ट्रक व गोवा बनावटीची दारू जप्त करून आरोपींना ताब्यात घेतले आहे.

आजरा पोलीस रात्री आजरा-आंबोली रस्त्यावर गस्त घालत असताना हॉटेल तुळशीच्यासमोर गोव्याकडून येणारा टेम्पो-ट्रक अडविला. टेम्पो-ट्रकची तपासणी करता आरोपींनी गाडीच्या चोर कप्प्यात गोवा बनावटीची दारू लपविली असल्याचे लक्षात आले.

पोलिसांनी ३ लाख ७१ हजार प्रुपयांची मॅकडॉल व्हिस्कीचे १२१ बॉक्स, ९७ हजार ९२० रुपयांचे रॉयल चॅलेंज, व्हिस्कीचे २४ बॉक्स, ५ लाख रुपयांचा चॉकलेटी रंगाचा टेम्पो ट्रक, ५ हजार रुपयांचा ओपो कंपनीचा व ५०० रुपयांचा कार्बन कंपनीचा मोबाईल जप्त केला आहे.

टेम्पो ट्रकचा चालक शिवाजी ग्यानबा भुते (वय ४३), गणेश महादेव पिंगळे (वय ४०, दोघेही रा. खर्डा, ता. जामखेड, जि. अहमदनगर) यांना आजरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव, फौजदार नाथा पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल अमोल पाटील, अमर आडसोळे, चेतन घाटगे यांनी केली.

कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांचे कोरोना रोगाचे अनुषंगाने संचारबंदी आहे. या आदेशाचा भंग करून बेकायदेशीररीत्या महाराष्ट्राचा कर चुकवून गोवा बनावटीची दारू विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करीत असताना टेम्पो-ट्रकसह दारू पकडण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव करीत आहेत.

* फोटो ओळी : आजरा पोलिसांनी ९ लाख ७५ हजारांची गोवा बनावटीच्या जप्त केलेल्या दारू व आरोपीसोबत पोलिसांचे पथक.

क्रमांक : ३१०५२०२१-गड-०१