शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

आता कार्यालयाबाहेर एजंटगिरी

By admin | Updated: July 16, 2014 23:45 IST

हातकणंगले तहसील कार्यालयातील सरकारी बाबंूवर कारवाईची मागणी

हातकणंगले : तालुक्यातील ६२ गावांतील तहसील कार्यालयाकडे कामासाठी येणाऱ्या विद्यार्थी-नागरिकांची कामे वेळेत होण्यासाठी तसेच तहसील कार्यालयाच्या कामामध्ये एजंटगिरी करणाऱ्यांनाही चाप बसावा याकरिता तहसील कार्यालयाच्या प्रत्येक विभागामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून तहसीलदार दीपक शिंदे यांनी प्रशासनाला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. याचे नागरिकांनी स्वागत केले. मात्र, काही सरकारी बाबू आजही आपल्या कामाचा निपटारा कार्यालयाबाहेर करत असल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. अशा सरकारी बाबूंवर कारवाई व्हावी, अशी मागणी आहे. तहसीलदार दीपक शिंदे यांनी आपल्या कामकाजाची सुरुवात प्रशासनाला शिस्त लावण्यापासून सुरू केली आहे. विद्यार्थ्यांना जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, रहिवासी दाखले यांबरोबरच जमीन महसूल, शासकीय रॉयल्टी, बिगर शेती जमीन, करमणूक आणि रेशनकार्ड या विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात एजंटांची कमाई सुरू होती. कोणतेही काम एजंटाशिवाय होत नाही, अशी स्थिती निर्माण झाली होती. वृद्धापकाळ योजनेची पेन्शन, संजय गांधी निराधाराचे अनुदान यामध्येही एजंटांचा धुमाकूळ सुरू होता. या संपूर्ण एजंटगिरीवर लक्ष ठेवून तहसीलदार दीपक शिंदे यांनी प्रत्येक विभागामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून प्रशासनावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला. या स्तुत्य कारभारामुळे नागरिकांनी त्यांच्या कामाचे स्वागत केले. (वार्ताहर)तहसीलदारांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून प्रशासनावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला असला, तरी तहसीलदारांच्या गैरहजेरीत काम घेऊन येणाऱ्या लोकांना कार्यालयाच्या बाहेरील टपऱ्या, हॉटेल यांच्या आश्रयाला बोलावून आपले सरकारी काम फत्ते करीत आहेत. एजंटांना कार्यालय बंदी असली, तरी सरकारी बाबू आपले काम कार्यालयाबाहेर करीत आहेत.