शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

सहीविनाच सदस्य निवडीचा अजेंडा

By admin | Updated: May 12, 2016 00:52 IST

महापालिका सभा : विषयांच्या आदेशाबाबत स्पष्टता नाही

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या स्थायी समितीवरील दोन तर परिवहन समिती व महिला बालकल्याण समितीच्या प्रत्येक एक सदस्याची निवड शुक्रवारी (दि. २०) होणार आहे. महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेचा अजेंडा बुधवारी प्रसिद्ध झाला. त्यामध्ये सदस्य निवडीचे विषय लावण्यात आले आहेत. एरव्ही महापौरांच्या आदेशाने सभा बोलविली जाते, परंतु शुक्रवारी होणाऱ्या (दि.२० मे) सभेच्या अजेंड्यावर कोणाचीही सही नसल्याने ही सभा कोणाच्या आदेशाने बोलाविली हे स्पष्ट होत नाही. प्रत्येक महिन्याची सभा ही महापौरांच्या आदेशाने व त्यांच्या सहीने नगरसचिव बोलवत असतात; परंतु सध्या महापौरपद रिक्त आहे. त्यामुळे २० मे रोजी होणाऱ्या सभेच्या अजेंड्यावर महापौर म्हणून कोणाचीही सही नाही. विशेष म्हणजे नगरसचिव यांचीही सही नाही. मग ही सभा कोणी बोलाविली असा प्रश्न अनेक नगरसेवकांना पडलेला आहे. या सभेत विषय क्रमांक २, ३ व ४ नुसार स्थायी समिती, परिवहन व महिला बालकल्याण समितीवरील रिक्त झालेल्या सदस्यांची निवड केली जाणार आहे. नीलेश देसाई व दीपा मगदूम यांचे नगरसेवकपद रद्द झाल्यामुळे त्यांच्या जागी स्थायी समितीवर दोन सदस्य निवडायचे आहेत. सचिन पाटील हे परिवहन समितीवर होते, वृषाली कदम या महिला बालकल्याण समितीवर होत्या. त्यांच्या जागीही नवे सदस्य निवडण्यात येणार आहेत. नगरसेवकपद रद्द झाल्यामुळे जी जागा रद्द झाली ती यापूर्वी ज्या पक्षाकडे होती त्या पक्षाचेचे सदस्य निवडले जातील तसेच त्यांच्या पक्षाच्या गटनेत्याने नावे नामनिर्देशित करायची आहेत. एकीकडे अपात्र नगरसेवक आपल्याविरोधातील कारवाईला उच्च न्यायालयातून स्थगिती मिळविण्याच्या प्रयत्नात असतानाच दुसरीकडे तातडीने महानगरपालिका प्रशासनाने समिती सदस्य निवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे या निवडी होणार की नाही याकडे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)महिला बालकल्याण समिती सभापती निवड मंगळवारीकोल्हापूर : जातीच्या अवैध दाखल्यामुळे वृषाली कदम यांना पायउतार व्हावे लागल्यामुळे महिला व बालकल्याण समितीच्या रिक्त झालेल्या सभापतिपदाची निवड मंगळवारी (दि. १७) सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी अमित सैनी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. मनपा नगरसचिव कार्यालयाने बुधवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. विभागीय जातपडताळणीच्या निकालाविरोधात कदम यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर सुनावणी व्हायची आहे. तोपर्यंत महानगरपालिका प्रशासनाने नवीन सभापतींची निवडणूक प्रक्रिया सुरू केली आहे. बुधवारी विभागीय आयुक्त कार्यालयाने नवीन सभापती निवडीचा कार्यक्रम निश्चित केला. त्यानुसार नवीन सभापती निवडीसाठी महिला व बालकल्याण समितीची सभा मंगळवारी (दि. १७) होईल. तत्पूर्वी शुक्रवारी दुपारी तीन ते सायंकाळी पाच यावेळेत उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत. चिठ्ठी टाकून निर्णयमहिला बालकल्याण समितीत काँग्रेस-राष्ट्रवादी व भाजप-ताराराणी आघाडीचे वृषाली कदम यांचे नगरसेवकपद रद्द झाल्यामुळे संख्याबळ समान ४-४ असे झाले आहे. त्यामुळे मंगळवारी सभापती निवडणुकीत समान मतदार होणार आहे. त्यावेळी चिठ्ठी टाकून सभापती निवडीचा निर्णय घ्यावा लागेल.