शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

कौमार्य चाचणीत अपयशी ठरल्याने दोघी बहिणींना पाठवले कोल्हापुरात माहेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:26 IST

कोल्हापूर : कौमार्य परीक्षेत अपयशी ठरल्याने दोन सख्ख्या बहिणींना विवाहानंतर अवघ्या तिसऱ्या दिवशी कोल्हापुरात माहेरी पाठवल्याची धक्कादायक घटना घडली. ...

कोल्हापूर : कौमार्य परीक्षेत अपयशी ठरल्याने दोन सख्ख्या बहिणींना विवाहानंतर अवघ्या तिसऱ्या दिवशी कोल्हापुरात माहेरी पाठवल्याची धक्कादायक घटना घडली. समाजाच्या जातपंचायतीनेही निर्णय देताना त्या मुलींना काडीमोड झाल्याचा आदेश दिल्याने दोन्ही पीडित मुलींवर आभाळ कोसळले. कोल्हापुरातील उपनगरात राहणाऱ्या कंजारभाट समाजातील दोघी बहिणींनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांचा आधार घेत राजारामपुरी पोलीस ठाण्यात बेळगाव येथील संदीप सनी गागडे व सुरजीत गागडे या दोघा सख्ख्या भावांसह चौघांवर तक्रार दिली. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या प्रकाराबद्दल संतापाची लाट उमटत आहे.

कोल्हापुरातील उपनगरात राहणाऱ्या कंजारभाट समाजातील एका कुटुंबातील दोन सख्ख्या बहिणींचा विवाह बेळगाव (कर्नाटक) येथील हनुमाननगरातील संदीप व सुरजीत गागडे यांच्यासोबत दि. २७ नोव्हेंबर २०२० ला झाला होता. दोन्ही कुटुंबीय एकाच समाजातील असल्याने त्यांच्यात कोमार्य चाचणीची पद्धत आहे. त्यानुसार या दोन्ही मुलींची परीक्षा घेण्यात आली. त्यामध्ये एक मुलगी अपयशी ठरली. घटनेनंतर संबंधित दोन्ही मुलींच्या चारित्र्यावर संशय घेत सासरच्या लोकांकडून त्यांचे शारीरिक आणि मानसिक शोषण सुरू झाले. लग्नांनतर तीन दिवस या मुलींशी त्या पतींनी त्यांच्याशी शारीरिक संबंधही ठेवले. त्यांनंतर त्यांनी त्या दोघींना घरातून हाकलून काढून कोल्हापुरात माहेरी पाठवले. मुलींच्या नातेवाइकांनी संबंध जुळवण्यासाठी प्रयत्न केले; पण त्यात अपयश आले.

दरम्यान, दि. ३ फेब्रुवारीला दोन्ही मुलींना व त्याच्या आईला कोल्हापुरात शाहू टोल नाक्यानजीकच्या एका मंदिरात बोलावून घेतले. तिथे जात पंचायत बसवली. पंचायतीने त्या दोन मुलींना काडीमोड झाल्याचा निर्णय दिला. तसेच दोन्ही मुले आणि मुलींना समाजातील विवाह इच्छुकांची विवाह करण्याचे स्वातंत्र असल्याचेही स्पष्ट केले. पंचयतीने अचानक दिलेल्या या निर्णयाने पीडित मुलींवर आभाळ कोसळले.

घटनेनंतर पीडित मुलींनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे रीतसर अर्ज केला. त्यानुसार गुरुवारी राजारामपुरी पोलीस ठाण्यात संदीप गागडे, सुरजीत गागडे या दोघा भावांसह शोभा सनी गागडे, ईश्वर गागडे यांच्याविरोधात तक्रार दिली. घटनेनंतर पीडित त्यांच्यावर तक्रार नोंदवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

कोट...

पीडित मुलींच्या कुटुंबियांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे रीतसर लेखी दाद मागितली. त्यानुसार आम्ही पीडित मुलींना घेऊन समितीच्या गीता हसूरकर, सीमा पाटील, रमेश वडणगेकर, सुजाता म्हेत्रे यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

-सुजाता म्हेत्रे (अंनिस पदाधिकारी)

बाभळीच्या काड्या अन् काडीमोड

शाहू टोल नाक्यानजीक मंदिरात जातपंचायतीने पीडित मुली व संशयित दोघा आरोपींसह त्यांची आई यांच्यासमोर बाभळीच्या पाच काड्या समोर ठेवल्या. त्या एकमेकांवर पाच वेळा मारून त्या मुलींवरून उतरून दोन्ही बाजूला टाकल्या, झाले काडीमोड. असा जातपंचायतीचा नात्यातील काडीमोडची प्रथा असल्याचे पीडितांनी सांगितले.