शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

जामीनानंतर ‘तोतया’ पोलीस पुन्हा जाळ्यात

By admin | Updated: December 1, 2015 00:17 IST

प्रभूला मालवणात जामीन : देवगड पोलिसांनी केली अटक

 सावंतवाडी : शहरातील एका सायबर कॅफे चालकाची फसवणूक केल्याप्रकरणी संशयित पंकज रवींद्र प्रभू याला तीन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर न्यायालयाने जामिनावर मुक्त केले. मात्र त्याच्या विरोधात देवगड पोलीस ठाण्यात व्यावसायिकाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असल्याने न्यायालयाचा जामीन होताच देवगड पोलिसांनी प्रभूला ताब्यात घेत अटक केली आहे.दरम्यान, संशयिताला ताब्यात घेण्यासाठी आलेल्या दोन महिला पोलीस अधिकार्यांना त्याने चकवा देत पळ काढण्याचा प्रयत्न केला. याचवेळी मालवणचे पोलीस उपनिरीक्षक डॉ. सागर वाघ यांनी मोठ्या शिताफीने त्याला पकडून देवगड पोलिसांच्या स्वाधीन केले. सायंकाळी उशिरा अटक करून त्याची देवगडपोलीस ठाण्यात रवानगी केली. मालवण येथील योगक्षेम ट्रेडर्सचे मालक योगेश पटकारे यांची १५०० रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी मालवण पोलिसांनी २६ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करून अटक केली. शुक्रवारी प्रभू याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ३० नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी दिली होती. २९ नोव्हेंबर रोजी शिरगाव-देवगड येथील अजित चव्हाण यांनी रवींद्र प्रभू याने मार्च २०१४ साली आपली २ लाखाची फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली. त्यानुसार प्रभू याच्या विरोधात देवगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. देवगड पोलीस उपनिरीक्षक श्रीमती एम. आर. पाटील हे प्रभू याला अटक करण्यासाठी फियार्दी चव्हाण यांच्यासह मालवण न्यायालयात हजर झाले. प्रभू याची न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली. त्यानंतर देवगड पोलिसांनी मालवणचे पोलीस उपनिरीक्षक डॉ. सागर वाघ यांच्या मदतीने ताब्यात घेत अटक केली. त्यामुळे तोतया पोलीस पुन्हा एकदा पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. मालवण पोलीसात प्रभू याची आता भेट झाली असता माझे दोन लाख रुपये व व्याज उद्या फोन करून देतो असे सांगितल्याचे चव्हाण यांनी सांगितले आहे. या साऱ्या प्रकारानंतर अन्य ठिकाणाहूनही प्रभू याच्या विरोधात तक्रारी नोंदवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (प्रतिनिधी)पंकज प्रभू याच्या विरोधात देवगड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करणारे अजित चव्हाण यांनी प्रभू याने आपल्याला २ लाखाला फसवले. तर कोल्हापूर येथील एका व्यक्तीला दीड लाख, रत्नागिरी येथील एकाला ४० हजार, तर ठाणे येथील एका बड्या इसमाला दीड करोड रुपयाचा चुना लावला असल्याचे सांगितले आहे.