शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकात प्रवेश करणाऱ्यांवर प्रशासनाची करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:36 IST

कोगनोळी : महाराष्ट्र व केरळमध्ये दुसऱ्या टप्प्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन कर्नाटक प्रशासनाने आंतरराज्य सीमेवर तपासणी पथक ...

कोगनोळी : महाराष्ट्र व केरळमध्ये दुसऱ्या टप्प्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन कर्नाटक प्रशासनाने आंतरराज्य सीमेवर तपासणी पथक उभे केले आहे. कोगनोळीजवळील या सीमेवरून कर्नाटक राज्यात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना थर्मल स्क्रीनिंग करूनच राज्यात प्रवेश दिला जात आहे. शेजारील राज्यांप्रमाणे आपल्या राज्यातही दुसऱ्या टप्प्याचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सावध पवित्रा घेत बाहेरून येणाऱ्या प्रवाशांवर प्रशासन करडी नजर ठेवत असल्याचे निदर्शनास येत आहे.

शनिवार दिनांक 20 रोजी कोगनोळी टोल नाका याठिकाणी कोरोना तपासणी पथकाची उभारणी केल्यानंतर कर्नाटक राज्यात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींना कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र अनिवार्य केले असल्याचे तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी सांगितले होते. या पार्श्‍वभूमीवर आज प्रांताधिकारी युकेश कुमार यांनी या तपासणी नाक्याला भेट देऊन पाहणी केली व कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र अनिवार्य केले असल्याच्या वक्तव्यास दुजोरा दिला.

यावेळी बोलताना प्रांताधिकारी युकेश कुमार म्हणाले, प्रमाणपत्र सक्तीचे केले असले तरी त्याबाबत जनतेमध्ये जागृती होणे आवश्यक आहे. या सीमेवर वाहतूक जास्त आहे त्याबरोबरच स्थानिक लोकांचाही वारंवार प्रवास होत असतो. या सर्व गोष्टी नियंत्रणात ठेवण्यासाठी हळूहळू पावले उचलली जात आहेत.

यावेळी निपाणी तालुका पंचायत कार्यवाहक मल्लिकार्जुन उळागड्डी, निपाणी नगरपालिकेचे आयुक्त महावीर बोरन्नावर, तालुका आरोग्य अधिकारी विठ्ठल शिंदे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

फोटो ओळ : कोगनोळी टोलनाक्यावरून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या वाहनधारकांना कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र अनिवार्य असल्याबाबत प्रांताधिकारी युकेश कुमार यांनी आवाहन केले.

छाया : बाबासो हळिज्वाळे