शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

लाटकरांसह कार्यकर्त्यांना पोलिसांकडून ‘व्हीआयपी’ वागणूक

By admin | Updated: November 7, 2015 00:18 IST

पोलीस दलाच्या अब्रूचे धिंडवडे : शाहूपुरी पोलीस ठाण्यात भज्यांवर मारला ताव

कोल्हापूर : महानगरपालिका निवडणूक प्रचाराच्या वादातून सोमवारी (दि. २६) कदमवाडी, विचारेमाळ परिसरात राजू लाटकर व सत्यजित ऊर्फ नाना कदम यांच्या समर्थकांत झालेल्या राड्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी शुक्रवारी ‘राष्ट्रवादी’ शहर अध्यक्ष व माजी नगरसेवक राजू लाटकर, महेश जाधव यांच्यासह अकरा कार्यकर्त्यांना अटक केली. या संशयितांवर गंभीर गुन्हे दाखल असूनही शाहूपुरी पोलिसांनी लाटकरसह सर्वच आरोपींना ‘व्हीआयपी’ वागणूक दिली. स्पेशल चहासह गरमागरम कांदाभजी खाण्यास दिल्याने पोलीस दलाच्या अब्रूचे पुन्हा एकदा धिंडवडे निघाले. संशयित आरोपी राजेश लाटकर (शिवाजी पार्क), महेश जाधव, वसंत पुजारी, पप्पू ऊर्फ इम्रान पठाण, अमर मोरे, विशाल चव्हाण, अय्याज फकीर, राहुल पाटील, विकास सावंत, अमोल तरणाळ, विनोद तातोबा भोसले अशी त्यांची नावे आहेत. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी टाकळकर यांच्यासमोर हजर केले असता त्यांची वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका केली. महापालिका निवडणूक प्रचाराच्या वादातून राष्ट्रवादी काँग्रेस व ताराराणी आघाडीच्या प्रमुख नेत्यांमध्ये राडा झाला. राजू लाटकर यांना ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याने त्यांच्या समर्थकांनी नाना कदम यांच्या कार्यालयावर हल्ला चढवीत वाहनांची व साहित्याची तोडफोड केली. याला प्रत्युत्तर म्हणून कदम यांच्या समर्थकांनी लाटकर यांच्या विचारेमाळ येथील कार्यालयासह कदमवाडीतील बंगल्यावर हल्ला चढवीत तोडफोड केली. लाटकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ताराराणी आघाडीचे संशयित सुहास लटोरे, सुनील कदम, आशिष ढवळे, उदय इंगळे, सत्यजित कदम, सुजित कदम, शशिकांत कदम यांच्यासह दीडशे कार्यकर्त्यांवर तसेच शशिकांत शिवाजीराव कदम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित राजू लाटकर, महेश जाधव, वसंत पुजारी, पप्पू पठाण, विशाल चव्हाण, आदींसह वीस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, राजू लाटकर, महेश जाधव यांच्यासह अकरा कार्यकर्ते शुक्रवारी बाराच्या सुमारास स्वत:हून हजर झाले. या सर्वांना गुन्हे शाखेच्या व्हरांड्यात बसविले होते. लाटकर यांना पोलिसांनी स्वतंत्र खुर्ची बसण्यास दिली होती. त्यांच्या पाठीमागे व समोर त्यांचे कार्यकर्ते बसून होते. लवकर कोर्टात हजर करण्यासाठी ते पोलिसांना दरडावत होते. यावेळी उशीर होत असल्याचे लक्षात येताच ड्युटीवरील पोलिसांनी स्पेशल चहा व गरमागरम कांदाभजी या संशयितांना आणून दिली. इतरवेळी साध्या किरकोळ मारहाणीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींना हाता-पायाला बेड्या ठोकून जमिनीवर बसविले जाते. काहीवेळा पट्ट्यानेही ठोकले जाते; परंतु या आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल असूनही केवळ राजकीय दडपणाखाली त्यांना ‘व्हीआयपी’ वागणूक देत शाहूपुरी पोलिसांनी प्रतिमा धुळीस मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. (प्रतिनिधी)