शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

‘बलभीम’च्या संचालकांवर आता कारवाई होणारच

By admin | Updated: March 29, 2016 00:49 IST

\चौकशी रद्दची मागणी फेटाळली : १३ एप्रिलला अंतिम सुनावणी

कोल्हापूर : नोंदणी रद्द झाली आहे, त्याचबरोबर विलीनीकरण योजनेनुसार संचालकांची चौकशी करता येणार नाही, ही बलभीम को-आॅप. बॅँकेच्या संचालकांची याचिका प्राधिकृत अधिकारी सुनील शिरापूरकर यांनी सोमवारी फेटाळून लावली. त्यामुळे संचालकांवरील कारवाईचा मार्ग मोकळा झाला असून, या निर्णयावर वरिष्ठांकडे अपील करण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत दिली आहे. आता १३ एप्रिलला अंतिम सुनावणी होणार आहे. बलभीम बॅँकेच्या नुकसानीस जबाबदार धरत २० संचालक व दोन व्यवस्थापकांवर चार कोटी २३ लाखांच्या जबाबदारी निश्चितीची कारवाई केली आहे. याबाबत शिरापूरकर यांच्याकडे सुनावणी सुरू असून, २२ मार्चच्या सुनावणीमध्ये चौकशीच्या कारवाईवरच संचालकांनी हरकत घेतली होती. बलभीम बॅँकेची नोंदणी रद्द झाल्याने सहकार कायद्यानुसार चौकशी करता येत नाही. त्याचबरोबर बलभीम बॅँक विलीनीकरणावेळी सर्व येणी-देणीसह करार झालेला आहे. त्यामुळे तुम्हाला चौकशीच करता येणार नसल्याचा युक्तिवाद अ‍ॅड. अभिजित कापसे व अ‍ॅड. दीपक पाटील यांनी केला होता. त्यावर सोमवारी सुनावणी होऊन सहकार आयुक्तांच्या ३० जून २०११ च्या कलम ८८ नुसार चौकशीचे आदेश आहेत. चौकशीची प्रक्रिया थांबविण्याची कार्यकक्षा आपल्या अखत्यारित येत नसल्याने चौकशीची कारवाई थांबवू शकत नसल्याचे सुनील शिरापूरकर यांनी सांगितले. त्याचबरोबर विलीनीकरण योजनेचे परिशिष्ट प्रकरण २(१) व (सी) नुसार ही चौकशी पुढे चालू ठेवता येते, असे सांगत शिरापूरकर यांनी संचालकांचे म्हणणे फेटाळून लावले.याबाबत विभागीय सहनिबंधकांकडे म्हणणे सादर करण्यासाठी महिन्याची मुदत द्यावी, अशी मागणी संचालकांनी केली; पण १२ एप्रिलपर्यंत मुदत देऊन १३ एप्रिलला अंतिम सुनावणी होईल, असे शिरापूरकर यांनी सांगितले. सचिवांकडेच आव्हान द्यावे लागणारसहकार आयुक्तांच्या आदेशानुसार ही चौकशी सुरू असल्याने प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या निर्णयाला आव्हान द्यायचे असल्यास ते सहकार सचिव अथवा न्यायालयातच द्यावे लागणार आहे; पण संचालकांनी चौकशी अधिकाऱ्यांकडे सहनिबंधकांकडे अपील करण्यासाठी मुदत मागितली आहे.