शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
2
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
3
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
4
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीची माहिती, ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावली मोठी भूमिका; कोण आहेत 'रॉ'चे नवे बॉस पराग जैन?
5
सिंधुदुर्गातील घनदाट जंगलात सापडला मानवी सांगाडा, मृतदेह कुणाचा? तपासातून समोर आली धक्कादायक माहिती
6
Railway Job: रेल्वेत नोकरीची संधी, सहा हजारांहून अधिक पदं भरली जाणार, लगेच करा अर्ज!
7
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
8
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
9
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
10
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
13
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
14
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
15
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
16
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
17
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
18
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
19
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
20
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड

जवाहरनगरात गुंडांच्या दोन टोळ्यांमध्ये हाणामारी

By admin | Updated: October 10, 2016 00:58 IST

तलवार हल्ला : दोघे गंभीर; वाहनांची तोडफोड

कोल्हापूर : मित्राला मारहाण केल्याच्या रागातून जवाहरनगर येथील गुंडांच्या दोन टोळ्यांमध्ये शनिवारी मध्यरात्री जोरदार सशस्त्र मारामारी झाली. यावेळी झालेल्या तलवार हल्ल्यात दोघेजण गंभीर जखमी झाले. हल्लेखोरांनी कार, रिक्षा, दुचाकींची तोडफोड करून परिसरात प्रचंड दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. जवाहरनगर सिरत मोहल्ला येथील एम.एम.जी. ग्रुपचा जाबीर मलबारी व आर. सी. ग्रुपच्या अमित बामणे यांच्यात राडा झाल्याची चर्चा आहे. बामणे याच्यावर राजारामपुरी पोलिस ठाण्यात यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल आहेत. खुनी हल्ला आणि वाहनांची तोडफोड होऊनही राजारामपुरी पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष करत गुन्हेगारी टोळ्यांना अभय दिले आहे. अधिक माहिती अशी, जवाहरनगर येथे गेल्या दोन दिवसांपासून गुंडांच्या दोन टोळ्यांमध्ये धुसफूस सुरू होती. शनिवारी दुपारी मोटारसायकलवरून जाणाऱ्या एका तरुणास मारहाण केली. त्याचे पडसाद मध्यरात्री उमटले. दोन्ही टोळ्या एकत्र आल्याने जोरदार राडा झाला. यावेळी सिरत मोहल्ला परिसरातील आठ ते दहा गाड्यांची तोडफोड करत प्रचंड दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. दोन्ही बाजूंनी झालेल्या तलवार हल्ल्यामध्ये जाबीर मलबारी व अमित बामणे हे गंभीर जखमी झाले. बामणे याला सीपीआरमध्ये दाखल केले, तर मलबारी याला खासगी रुग्णालयात दाखल केले. घरासमोर पार्किंग केलेल्या गाड्या फोडल्याने नागरिकांनी राजारामपुरी ठाण्यात तक्रारी दिल्या. दरम्यान, जवाहरनगर व सिरत मोहल्ला परिसरातील दोन्ही बाजूंच्या प्रमुख व्यक्तींनी दोन्ही टोळ्यांमध्ये मध्यस्थी केल्याने या प्रकरणी रविवारी रात्रीपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. (प्रतिनिधी)