शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कारवाईची भाषा अन् पाठराखणही

By admin | Updated: February 3, 2015 00:41 IST

महापौर लाच प्रकरण : मुश्रीफ यांचे वक्तव्य संभ्रम निर्माण करणारे

कोल्हापूर : राष्ट्रवादीच्या महापौर तृप्ती माळवी लाच घेताना सापडल्या याचे कधीच समर्थन करणार नाही, असे व्यासपीठावरून जाहीरपणे ठासून सांगितले तरी अप्रत्यक्षपणे आमदार हसन मुश्रीफ यांनी माळवी यांचीच पाठराखण केल्याचे सोमवारी अनुभवास आले. राष्ट्रवादी काँग्रेसला जाणीवपूर्वक बदनाम केले जात असल्याची शंका उपस्थित करून लाच कारवाईच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह लावले. शाहू सांस्कृतिक भवनमध्ये पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.मुश्रीफ म्हणाले, ‘‘महापौरांनी लाच घेतल्याचे अजिबात समर्थन करणार नाही. त्यांचा पक्षाने राजीनामा घेतला आहे. नोटीसही पाठविली आहे. याप्रकरणात महापौरांचे व्हाईस रेकॉर्डिंग झाल्याचे लाचलुचपत विभाग सांगत आहे. रेकॉर्डिंग तपासण्यासाठी फॉरेन्सिक प्रयोगशाळेकडे पाठविले आहे. तो अहवाल कधी येणार? त्या निर्दाेष असल्याचे सिद्ध कसे व कधी होणार, असे अनेक प्रश्न आहेत. माळवी यांच्या पतीचा खून झाला. त्या खटल्याची सुनावणी सुरू होत आहे. यातूनच हे कुभांड रचले असावे, असे माळवींचे म्हणणे आहे. याचाही विचार व्हायला हवा.’’पथक आजही रिकाम्या हाताने परतमहापौर माळवी यांचा रक्तदाब कमी-जास्त होत असल्याने त्यांची प्रकृती अद्याप स्थिर नसल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास त्यांना अटक करण्यासाठी गेलेले लाचलुचपत विभागाचे पथक पुन्हा रिकाम्या हाताने परतले. दरम्यान, महापौर माळवी यांच्यातर्फे अ‍ॅड. प्रशांत देसाई यांनी अटकपूर्व जामीन मंजुरीचा अर्ज विशेष जिल्हा न्यायाधीश के. डी. बोचे यांच्याकडे सादर केला. यावेळी न्यायाधीश बोचे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तपासी अधिकारी उदय आफळे व पद्मा कदम यांना चौकशी अहवाल आज, मंगळवारी सादर करण्याचे आदेश दिले. पाकीट संस्कृती..महानगरपालिकेच्या निवडणुकीत पाकीट संस्कृती बंद करू असे आश्वासन दिले होते. शंभर टक्के बंद करता आली नाही. परंतु, वचक ठेवला. प्रसारमाध्यमांनी पाहरेकऱ्यांची भूमिका बजावावी, निदर्शनास आणून द्यावे, असेही मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.