शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

कृती समितीचे मिरजकर तिकटीला झेंडावंदन

By admin | Updated: August 13, 2014 23:36 IST

पालकमंत्र्यांचा निषेध : गेल्या दोन वर्षात टोलबाबत ठोस निर्णय घेण्यात अपयश

कोल्हापूर : शहरातील टोलबाबत राज्य शासनाने अद्याप ठोस निर्णय घेतलेला नाही. पालकमंत्री हर्षवर्धन पाटील हे पर्यटनमंत्री असल्यासारखे कोल्हापुरला येतात. त्यांना जिल्ह्याच्या प्रश्नांबाबत काहीही देणे-घेणे नाही. याच शब्दात आज, बुधवारी येथे झालेल्या सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत निषेध केला. जिल्हा प्रशासनाच्या निषेधार्थ शुक्रवारी स्वातंत्र्य दिनानिमित्त मिरजकर तिकटी चौकात हुतात्मा स्मारकाजवळ स्वातंत्र्य सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा निर्णय कृती समितीने घेतला आहे. सकाळी साडेनऊ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे यांनी केले आहे.राज्य शासनाने शहरातील टोलबाबत ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा यापूर्वीच कृती समितीने दिला होता. यापूर्वी नियोजनात ठरल्याप्रमाणे ८ आॅगस्ट रोजी भवानी मंडपात एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. आता शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमाऐवजी मिरजकर तिकटी येथे ध्वजारोहण करण्याचा निर्णय घेण्यात आला.सकाळी ८:३० ते ९ :१५ ही वेळ शासकीय ध्वजारोहणासाठी राखीव आहे. यानंतर झेंडावंदन करण्याचे बैठकीत ठरले. कोणत्याही परिस्थितीत कसल्याही प्रकारचा अवमान होणार नाही. काही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता कार्यकर्त्यांनी घ्यावी, अशी सूचना निवास साळोखे, दिलीप देसाई, बाबा इंदुलकर यांनी केली. यावेळी हंबीरराव मुळीक, अशोकराव साळोखे, दिलीप पवार, रामभाऊ चव्हाण, भगवान काटे, चंद्रकांत यादव, महेश जाधव, आदींसह कृती समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)