शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई

By admin | Updated: April 27, 2015 00:11 IST

गिरीश बापट : मिरजेत जनता मेडिकलच्या इमारतीचे उद्घाटन

मिरज : औषधांचा काळाबाजार, जादा दराने विक्री, मुदतबाह्य औषधांची विक्री, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे विक्री करणाऱ्यांवर राज्यात कठोर कारवाई करण्यात येईल. महागड्या औषधांना पर्याय म्हणून स्वस्त जेनेरिक औषधे उपलब्ध करण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले.मिरजेत जनता मेडिकल स्टोअर्सच्या नूतन इमारतीचे उद्घाटन मंत्री गिरीश बापट व संभाजीराव भिडे गुरुजींच्याहस्ते झाले. औषधांचा संबंध मानवी जिवाशी असल्याने या व्यवसायात सचोटी असलीच पाहिजे, असे मंत्री बापट यांनी सांगितले. सचोटीने औषध व्यवसाय करणाऱ्या औषध विक्रेत्यांना शासन सहकार्य करेल. त्यांच्या अडचणी दूर करू, मात्र काळ्या बाजारासह अन्य गैरप्रकार करणाऱ्या विक्रेत्यांना मानवी जिवाशी खेळू दिले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.खासदार संजय पाटील, संभाजीराव भिडे यांनीही जनता मेडिकल स्टोअर्सचे संचालक शीतलनाथ पाटील व कोमलनाथ पाटील यांना शुभेच्छा दिल्या. आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, माजी आमदार गजेंद्र ऐनापुरे, भाजप जिल्हाध्यक्ष राजाराम गरूड, प्रकाश बिरजे, मकरंद देशपांडे, दीपक शिंदे, गजेंद्र कुल्लोळी, धनपाल खोत, क्रांतिनाथ पाटील, प्रकाश शेडबाळे, विनोद कोकाटे यांच्यासह सांगली-मिरज परिसरात औषध विक्रेते, राजकीय, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. शीतलनाथ पाटील यांनी प्रास्ताविक केले. सौ. सविता पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)जेनेरिक औषधे उपलब्ध करून देणारकाही विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणावर औषधांचा काळाबाजार करण्यात येतो, ग्राहकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन जादा दराने औषधांची विक्री केली जाते. औषधे चुकीची व डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पुरविल्यास रुग्णांच्या जीवाचे बरेवाईट होऊ शकते. यामुळे राज्य सरकारने अशा विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याचे ठरविले आहे. अनेक कंपन्यांकडून चढ्या दराने औषधांची विक्री केली जाते. यामुळे राज्य सरकार अशा औषधांना पर्याय म्हणून अशी जेनेरिक औषधे उपलब्ध करून देणार असल्याचे यावेळी मंत्री गिरीश बापट यांनी सांगितले.