शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

संक्षीप्त.. क्राईम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:26 IST

कोल्हापूर : केएमटी बस खड्डयातून घालून सीटवर बसलेल्या महिला प्रवाशाच्या पाठीच्या मणक्याला दुखापत झाली. याप्रकरणी प्रवासी सुलोचना वसंत चव्हाण ...

कोल्हापूर : केएमटी बस खड्डयातून घालून सीटवर बसलेल्या महिला प्रवाशाच्या पाठीच्या मणक्याला दुखापत झाली. याप्रकरणी प्रवासी सुलोचना वसंत चव्हाण (वय ६०, रा. सागर माळ परिसर) यांनी केएमटी चालक अमोल कांबळे याच्यावर राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सायबर चौक ते शाहू मैदान या मार्गावरून प्रवास करताना शनिवारी हा प्रकार घडला होता.

भांडण सोडवणाऱ्यास मारहाण

कोल्हापूर : कुल्फी गाडाचालकास मारहाण सुरू असताना भांडणे सोडविण्यास गेलेल्या तरुणास काठीने बेदम मारहाण करण्याचा प्रकार घडला. तौफिक नुरमहंमद सय्यद (वय २९, रा. सदरबाझार) असे जखमीचे नाव आहे. त्याच्या डोळ्यानजीक गंभीर दुखापत झाली आहे. मध्यवती बस स्थानक परिसरात रविवारी हा प्रकार घडला. शाहुपूरी पोलीस चौघा हल्लेखोरांचा पोलीस शोध घेत आहेत.

रॉडच्या हल्ल्यात एक जखमी

कोल्हापूर : मावशीला शिवीगाळ का करतोस असा जाब विचारल्याच्या कारणावरून मायाप्पा वसंत कांबळे (३५, रा. विचारेमाळ) यांना लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. त्यांच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना सीपीआर रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात सचिन सोमा कांबळे (रा. विचारेमाळ) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

भाजीमंडईतून मोबाइल लंपास

कोल्हापूर : गंगावेश येथील ऋणमुक्तेश्वर भाजीमंडईतून भाजीखरेदी करणारे अशोक नळुकराव रणदिवे (६६, रा. शनिवारपेठ) यांचा ४० हजार रुपये किमतीचा मोबाइल अज्ञात चोरट्याने लंपास केला. आठवडी बाजारावेळी हा प्रकार घडला. लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.