कोल्हापूर : रस्त्याच्या उजव्या बाजूने साईड पट्टीवरून जाणाऱ्या पादचाऱ्यास भरधाव चारचाकी वाहनाने धडक देऊन जखमी केले. धनराज रंगाप्पा आर (वय ३२, रा. हळदी, मूळ गाव देवरापुरा बेल्लूर, रा. कर्नाटक) असे जखमीचे नाव आहे. ही घटना कुर्डू तिट्ट्यानजीक घडला. याबाबत अविचाराने चारचाकी वाहन चालवून अपघात घडविल्याप्रकरणी चालक नेताजी दत्तात्रय चौगले (रा. हळदी, ता. करवीर) याच्यावर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
दुचाकी चोरी
कोल्हापूर : लक्ष्मीपुरीतील अयोध्या चित्रमंदिराच्या परिसरातून घराच्या दारात उभी केलेली दुचाकी अज्ञाताने चोरून नेली. याबाबत दुचाकीमालक शीतल जिवंधर वणकुंद्रे (वय ५०) यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
पादचाऱ्यास दुचाकीची धडक
कोल्हापूर : कसबा बीड ते बीडशेड रस्त्याच्या कडेला उभारलेल्या पादचाऱ्यास भरधाव दुचाकीने धडक दिली. यामध्ये आनंदा महदेव ताशिलदार (वय ५८, रा. कसबा बीड) हे जखमी झाले. या अपघातप्रकरणी दुचाकीचालक शैेलेश बाजीराव रावण (२०, रा. केकतवाडी, ता. करवीर) याच्यावर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
(तानाजी)