शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ५ पाणीपुरवठा संस्थांचे ८२ लाख शासनाकडे परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:34 IST

दत्ता बिडकर हातकणंगले : सहकारी पाणीपुरवठा संस्थांना प्रकल्प खर्चाच्या २५ % अनुदान शासनाकडून दिले जाते. ३१ मार्च २०२१ ला ...

दत्ता बिडकर

हातकणंगले : सहकारी पाणीपुरवठा संस्थांना प्रकल्प खर्चाच्या २५ % अनुदान शासनाकडून दिले जाते. ३१ मार्च २०२१ ला जिल्ह्यातील पाच सहकारी पाणीपुरवठा संस्थांना ८२ लाख ९ हजार रुपयांचे अनुदान मंजूर झाले होते. पुणे सहकार आयुक्त विभागाकडून मंजूर अनुदान गेल्या दोन महिन्यांत संस्थांना वाटप केले नसल्याने परत शासनाकडे जमा झाले आहे. मंजूर अनुदान परत गेल्याने शेतकऱ्यांच्या बँक कर्जाचे ओझे वाढत आहे. पुणे सहकार विभागाच्या गलथान कारभारामुळे शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जात आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना नदी किंवा तलावातून मोठा खर्च करून शेतीला पाणीपुरवठा योजना करणे परवडत नसल्याने शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन सहकारी पाणीपुरवठा संस्थाच्या माध्यमातून शेतीला शाश्वत पाणी योजना सुरू केल्या. लाभधारक सभासद शेतकऱ्यांनी त्यांच्या सातबारा उताऱ्याच्या हमीवर बँकांकडून कर्ज काढून पाणीपुरवठा संस्थांच्या माध्यमातून शेतीला पाण्याची सोय केली. लाभधारक शेतकऱ्यांच्या सहकारी पाणीपुरवठा संस्थांना प्रकल्प खर्चाच्या २५ % अनुदान देण्याची योजना तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी सीएसएल १४९४ /२८२२ दि. १९ / ११ / १९९४ ला शासन निर्णय घेऊन सुरू केली. त्यामध्ये तीन वेळा दुरुस्ती होऊन ही योजना आतापर्यंत सुरू आहे.

सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाचे कार्यासन अधिकारी अ. ज. चौधरी यांनी २०२०-२१ या आर्थिक वर्षामध्ये शासन निर्णय सीएसएल १५२० दि. ३१ मार्च २०२१ रोजी जिल्ह्यातील पाच सहकारी पाणीपुरवठा संस्थांना ८२ लाख ९ हजारांचे २५ % अनुदान मंजूर केले होते. हे अनुदान पंधरा दिवसांत संस्थांनी कर्ज घेतलेल्या बँक खात्यामध्ये जमा करणेचे आदेश सहकार आयुक्त, पुणे यांना मंत्रालयस्तरावरून झाले होते. सहकार विभागाने हे अनुदान वाटपच केले नाही. दोन महिने अनुदान रक्कम तशीच पडून राहिल्याने शासनाच्या सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाने हे ८२ लाख ०९ हजार परत घेतल्याने पाणीपुरवठा संस्थांमध्ये सहभागी लाभधारक शेतकऱ्यांच्या बँक कर्जाचे ओझे वाढत आहे. पुणे सहकार विभागाच्या गलथान कारभारामुळे शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जात आहे.