शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

जयसिंगपूरमध्ये ७४ लाखांची रोकड जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 01:04 IST

जयसिंगपूर : संभाजीपूर येथे उपसरपंच गौसमहमद अन्वर गवंडी (वय ४७, रा. कचरे सोसायटी, संभाजीपूर) यांच्या गोदामात बेकायदेशीर गुटख्याचा साठा ...

जयसिंगपूर : संभाजीपूर येथे उपसरपंच गौसमहमद अन्वर गवंडी (वय ४७, रा. कचरे सोसायटी, संभाजीपूर) यांच्या गोदामात बेकायदेशीर गुटख्याचा साठा तर जयसिंगपूर शहरातील बाराव्या गल्लीत त्यांच्याच दुकानातून ७४ लाख ६५ हजार २०० रुपयांची बेहिशोबी रोकड मंगळवारी रात्री भरारी पथक व जयसिंगपूर पोलीस यांच्या संयुक्त पथकाने जप्त केली.या कारवाईत गौसमहमद अन्वर गवंडी (वय ४७, रा. कचरे सोसायटी, संभाजीपूर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. अन्न व औषध भेसळ विभागाकडून रात्री उशिरापर्यंत गुटखा साठ्याची मोजदाद सुरू होती. तर आयकर विभागाचे कर्मचारी रात्री उशिरापर्यंत याबाबत खात्री करत होते. जयसिंगपूरचे सपोनि नामदेव शिंदे यांना खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीमुळे गुटखा साठा त्याबरोबर बेहिशोबी रक्कम जप्त करण्यात आली.याबाबत भरारी पथक व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, खबºयामार्फत मिळालेल्या माहितीनुसार संभाजीपूर येथील गवंडी यांच्या गोदामात ४० लाख रुपयांचा गुटखा असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांच्या पथकाने त्याठिकाणी छापा टाकला असता गुटख्याचा साठा मिळाला.ही कारवाई सुरू असताना गवंडी यांच्या मालकीच्या जयसिंगपूर येथील बाराव्या गल्लीतील गवंडी टोबॅको दुकानावर देखील छापा टाकण्यात आला. यावेळी दुकानातून एक महिला तीन बॅगा घेऊन जात असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. दुकानासमोर असलेल्या एका घरात या बॅगा त्या महिलेने टाकल्या होत्या. पथकाने तत्काळ या बॅगा ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्यामध्ये रोकड मिळून आली.त्याची मोजदाद केल्यानंतर सुमारे ७४ लाख ६५ हजार २०० रुपये बेहिशोबी रक्कम असल्याचे पथकाने सांगितले. रात्री उशिरापर्यंत पथकाकडून गुटख्याची मोजदाद सुरू होती. गोडावूनमध्ये मोठ्या प्रमाणात सुपारीचा साठादेखील सापडला आहे. केंद्रीय जीएसटी पथकाला याबाबतची माहिती देण्यात आली आहे.पैशांची चौकशी होणारभरारी पथक व जयसिंगपूर पोलिसांच्या कारवाईत ७४ लाख ६५ हजार २०० रुपयाची बेहिशोबी रक्कम सापडली असून रक्कमेबाबत आयकर विभागाला माहिती देण्यात आली. हे पैसे निवडणुकीत वाटण्याकरीता आणण्यात आले होते का, ही माहिती आयकर विभागाच्या तपासणी अहवालानंतरच पुढे येणार आहे, असे तहसीलदार गजानन गुरव व सपोनि नामदेव शिंदे यांनी दिली.