शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
2
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
3
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
4
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
5
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
6
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
7
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
9
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
10
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
11
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
12
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
13
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
14
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
15
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
16
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
17
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
18
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
19
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
20
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   

७० कोटींसाठी बैठकीला चालढकल

By admin | Updated: December 5, 2014 00:20 IST

महापालिका जाब विचारणार : आयआरबी व महामंडळाची नवी खेळी

संतोष पाटील - कोल्हापूर -महापालिका प्रशासनाने महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळास (एमएसआरडीसी)एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पातील १५हून अधिक कामांचा जाब विचारणारे पत्र आज, गुरुवारी पाठविले. ५० मीटरप्रमाणे ७.३ किलोमीटरचे क्रॉस रोड, निगेटिव्ह ग्रँडची रक्कम, वार्षिक देखभाल दुरुस्ती, वृक्षलागवड, अपूर्ण रस्ते व कामे, त्रयस्थ सल्लागाराची नेमणूक, रस्त्यांवरील अतिक्रमणे काढणे आदी कामांचे मिळून तब्बल ७० कोटी रुपयांचा जाब महापालिका प्रशासन विचारणार म्हणूनच महामंडळ व आयआरबी संयुक्त बैठकीला पाठ देत असल्याची चर्चा महापालिकेत आहे.आयुक्तांनी तारीख निश्चित करूनही महामंडळ व आयआरबी चौथ्या संयुक्त बैठकीला येण्याचे टाळत आहेत. त्यासाठी कोल्हापुरातील वातावरण सुरक्षित नसल्याचे कारण दिले जात आहे. बैठकीसाठी सुरक्षित वातावरण नाही, असे ‘आयआरबी’चे म्हणणे आहे, तर चोवीस तास राजरोजपणे टोलवसुली कशी करता असा सवाल उपस्थित केला जात आहे. मुंबईतील महामंडळाच्याच्या कार्यालयात अपूर्ण कामांबाबत २८ एप्रिल २०१४ला बैठक झाली. शहरातील अपूर्ण कामांची यादीच महापालिकेने सादर केली. ‘न्यायालयाच्या निर्णयानंतरच कामाबाबत चर्चा करता येईल. प्रथम टोलवसुली सुरू होऊ दे, आम्ही कामे करणारच आहोत’, अशी ‘आयआरबी’ने भूमिका घेतली होती. आता कोल्हापुरातील वातावरणच सुरक्षित नसल्याने कारण सांगत संयुक्त बैठकच टाळण्याचे नाटक केले जात आहे.कराराप्रमाणे आयआरबीने दरवर्षी रस्त्यांच्या देखभालीसाठी किमान अडीच कोटी रुपये खर्च करणे अपेक्षित आहे. त्यामध्ये फुटपाथ दुरुस्ती, पावसाळी पाणी नियोजन, ड्रेन स्वच्छता, झाडांची नीगा, नव्याने वृक्ष लागवड, नवीन रस्त्यांवरील अतिक्रमण काढणे आदींचा समावेश आहे. गेल्या अडीच वर्षांत याबाबत केलेल्या खर्चाचा तपशीलच कंपनीने दिलेला नाही. प्रकल्पातील तब्बल ३० कोटींपेक्षा अधिकची कामे अपूर्ण आहेत. महामंडळाकडे मनपाचे सव्वाचार कोटी रुपये गेली तीन वर्षे थकीत आहेत. क्रॉस रोड नियमाप्रमाणे केलेलेच नाही. निगेटिव्ह ग्रँडचे २७ कोटी रुपये परत द्या, असा तगादा महानगरपालिकेने लावला आहे. न्यायालयाने टोलवसुलीस हिरवा कंदिल दाखविल्यानंतर महानगरपालिका प्रशासन अधिकच आक्रमक झाले आहे. त्यामुळेच आयआरबी व महामंडळ बैठकीसाठी चालढकल करत असल्याचे चित्र आहे.२७० नव्हे, सव्वा सात किलोमीटरचे रस्तेआयआरबीने शहरातील ५५ मोठे व १८ लहान जंक्शनला जोडणारे रस्ते करणे बंधनकारक आहे. दोन्ही बाजूला ५० मीटर याप्रमाणे या रस्त्यांची लांबी ७.३ किलोमीटर इतकी भरते. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या निकषांप्रमाणे एक किलोमीटर रस्त्यासाठी १७ लाख रुपये खर्च येतो. याप्रमाणे चौकातील रस्त्यासाठी आयआरबीला एक कोटी चोवीस लाख रुपये मोजावे लागणार आहेत. महापालिकेत आयआरबीने अद्याप २७० किमीचे रस्ते करणे बाकी असल्याची अफवा पसरल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर प्रशासनाने हे रस्ते फक्त सव्वा सात किलोमीटर असल्याचा खुलासा केला.