शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दाजीपूरला ६५ टक्के पर्यटकांची भेट

By admin | Updated: January 18, 2016 00:29 IST

दोन महिन्यांतील चित्र : गतवर्षीच्या तुलनेत ६० टक्के पर्यटक शुल्क जमा

राधानगरी : दाजीपूर अभयारण्यात यावर्षी पहिल्या दोन महिन्यांतच गतवर्षीच्या तुलनेत ६५ टक्के पर्यटकांनी भेट दिली, तर ६० टक्के प्रवेश शुल्क जमा झाले आहे. १ नोव्हेंबर ते ३१ मे या सात महिन्यांसाठी हे अभयारण्य पर्यटकांसाठी खुले असते. पर्यटकांसाठी सुविधांमध्ये काही प्रमाणात झालेली सुधारणा व मागील दोन महिन्यांतील दिवाळी, नाताळ अशा सलग सुट्यांमुळे ही वाढ झाल्याचे दिसते. विविध प्रकारचे प्राणी, पक्षी, फुलपाखरे, दुर्मीळ वनस्पती यामुळे जागतिक वारसा स्थळ असा समावेश, पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील अशी झालेली नोंद यामुळे वन्यप्रेमींसह वन्यजीव व पर्यावरण अभ्यासकांसह सर्वसामान्यांनाही या अभयारण्याबाबत कुतूहल आहे. प्रसारमाध्यमातून होणारी प्रसिद्धी तसेच येथील वनसंपदेच्या माहितीची काही दिवसांपूर्वी इंटरनेटवरून सोशल मीडियावर चित्रफीत प्रसिद्ध झाली होती त्याचाही परिणाम झाला आहे. वन्यजीव विभागाने ओलवन येथे परिस्थितीकीय विकास समिती स्थापन करून या कामात स्थानिकांना सहभागी करून घेतले आहे. त्यांच्या माध्यमातून ठक्याचावाडा येथे तंबू निवास, उपहारगृह सुरू केले आहे. निवासासाठी दोनजणांना एक हजार व चारजणांना एकहजार चारशे रुपये घेतले जातात. माळेवाडी येथील जलाशयात सहा आसन क्षमतेची साधी बोट आहे. तेथे जल विहार करता येतो, हौसी पर्यटकांना गिअरच्या नऊ सायकली तासी वीस रुपये भाड्याने मिळतात. वन विभागाच्या व खासगी निवासस्थानीही उपलब्ध आहे. खासगी हॉटेल झाल्याने जेवणाची सोय आहे. वनविभाग पर्यटकांकडून प्रवेश कर म्हणून मोठ्यांना तीस, लहान मुलांना पंधरा, मोटारसायकल पंचवीस, जीप शंभर व बसला एकशे पन्नास रुपये घेतो. गतवर्षी सात महिन्यांत ७,३५१ पर्यटकांकडून तीन लाख पंचेचाळीस हजार रुपये उत्पन्न मिळाले होते. यावर्षी नोव्हेंबर, डिसेंबर या दोन महिन्यांत ४,७९९ पर्यटक आले. त्यातून दोन लाख सहा हजार पाचशे साठ रुपये व तंबू निवासातून समितीला तब्बल ४६ हजार उत्पन्न मिळाले आहे. (प्रतिनिधी) विविध प्रकारचे प्राणी, पक्षी, फुलपाखरे, दुर्मीळ वनस्पती यामुळे दाजीपूर अभयारण्याचा जागतिक वारसा स्थळ म्हणून पर्यावरणदृष्ट्या अतिसंवेदनशील अशी झालेली नोंदप्रवेश करापोटी प्रौढांकडून ३० रुपये, लहान मुलांना १५, दुचाकीसाठी २५, जीपला १०० रुपये, तर बसला १५० रुपये आकारले जातात.माळेवाडी जलाशयात जलविहारासाठी सहा आसन क्षमतेची साधी बोट.हौसी पर्यटकांना गिअरच्या नऊ सायकली तासी २० रुपये भाड्याने उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.