शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

‘भोगावती’चे ६४६५ सभासद अपात्र

By admin | Updated: June 11, 2016 01:12 IST

कॉँग्रेस-राष्ट्रवादीला दणका : साखर सहसंचालक मंगळवारी न्यायालयात अहवाल सादर करणार

कोल्हापूर : परिते (ता. करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याचे वाढीव ६४६५ सभासद अपात्र ठरले. प्रादेशिक साखर सहसंचालकांनी केलेल्या चौकशीत एवढे सभासद बोगस आढळले असून, केवळ ६६७ सभासद पात्र ठरले. पात्र-अपात्र सभासदांचा अहवाल सहसंचालक मंगळवारी (दि. १४) उच्च न्यायालयात सादर करणार असून, या निर्णयामुळे कॉँग्रेस व राष्ट्रवादी-शेकाप आघाडीला चांगलाच दणका बसला आहे. राष्ट्रवादी-शेकाप आघाडीने केलेल्या ३४८६ वाढीव सभासदांविरोधात कारखान्याचे माजी अध्यक्ष सदाशिव चरापले यांनी ३० जुलै २०१२ रोजी प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे तक्रार केली होती. त्याचबरोबर कॉँग्रेस कालावधीत झालेल्या ४६५७ वाढीव सभासदांविरोधात बाबूराव पाटील यांनीही तक्रार केली होती. वाढीव सभासदांची महसूल विभागामार्फत छाननी करण्याची मागणी त्यांनी केली होती. हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचल्यानंतर न्यायालयाने वाढीव सभासदांची महसूल तपासणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार प्रादेशिक साखर सहसंचालकांनी सभासदनिहाय कागदपत्रांची तपासणी केली. सभासदांनी सादर केलेल्या महसुली पुराव्यांची संबंधित गावातील तलाठ्यांमार्फत चौकशी करण्यात आली. यामध्ये अनेकांचे महसुली पुरावे बोगस निघाल्याचे स्पष्ट झाले आहे. केवळ ६६७ सभासद पात्र ठरले असून ६४६५ सभासद पात्र ठरले. या निर्णयामुळे कॉँग्रेस, राष्ट्रवादी-शेकाप यांना मोठा दणका बसला आहे. वाढीव सभासदांबाबत मंगळवारी उच्च न्यायालयात सुनावणी आहे. यावेळीच प्रादेशिक साखर सहसंचालक सचिन रावल हे अहवाल सादर करणार आहेत. अपात्र सभासद कोणत्या निकषावर केले हे माहिती नाही. मात्र, ज्या सभासदांना अपात्र ठरवले आहे, त्यांच्यावर हा अन्याय आहे. हा चुकीचा निर्णय असून, याबाबत योग्यवेळी न्याय मागू. - धैर्यशील पाटील-कौलवकर, माजी अध्यक्ष, भोगावती कारखानान्यायालयाने केवळ २०१० नंतर झालेल्या सभासदांची तपासणी करण्याचे आदेश दिले असताना साखर सहसंचालकांनी २००० पासूनच्या सभासदांची तपासणी करून अन्याय केला आहे. याबाबत यापूर्वीच न्यायालयात याचिका दाखल केली आहे. - ए. डी. चौगले, कॉँग्रेस नेतेअपात्र सभासदांच्या साखरेचे काय ?सन २००० ते २०१० या कालावधीत केलेल्या सभासदांनी कारखान्याच्या निवडणुकीत मतदान केले होते. त्याचबरोबर अपात्र ६४६५ शेतकऱ्यांनी सभासद झाल्यापासून महिन्याला पाच किलो साखर सवलतीच्या दरात घेतल्याने कारखान्याचा कोट्यवधींचा तोटा झाला आहे. याबाबत सहसंचालक काय निर्णय घेणार, याविषयी उत्सुकता आहे. हे लावले निकष -अठरा वर्षे पूर्ण असावा...संबंधिताच्या नावावर किमान २० गुंठे क्षेत्र आवश्यक आहे. ऊस उत्पादक शेतकरी असावा.त्याने पाच रुपये प्रवेश फीसह १२५० रुपये भागापोटी भरलेले पाहिजेत.